sanjay raut | nana patole sarkarnama
मुंबई

Congress News: MVA बैठकीत नाना पटोले नको, राऊतांच्या भूमिकेवर काँग्रेसच्या बैठकीत आज निर्णय होणार

Maharashtra Vidhan Sabha Election Congress important Screening Committee meetings: CEC च्या बैठकीत मतदारसंघ निहाय उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. बैठकीनंतर आज रात्री उशिरा किंवा उद्या काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती आहे.

सरकारनामा ब्यूरो

New Delhi: काँग्रेस उमेदवारांच्या अनेक नावांवर आज दिल्लीत शिक्कामोर्तब होणार आहे. दिल्लीत काँग्रेसच्या आज दोन महत्त्वाच्या बैठका आज होत आहेत. निर्णय न झालेल्या जागांवर उमेदवार निश्चितीसाठी काँग्रेस पक्षाच्या स्क्रिनिंग कमिटीची आज सकाळी 10 वाजता बैठक आहे. या दोन्ही महत्वाच्या बैठका आज दिल्लीत होत आहे

कमिटीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. मागच्या बैठकीत 84 जागांवर चर्चा करून 62 जागांवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. आजच सायंकाळी 4 वाजता काँग्रेसच्या केंद्रीय निवडणुक समितीची (CEC)बैठक बोलावण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, मुकुल वासनिक यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

CEC च्या बैठकीत मतदारसंघ निहाय उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. बैठकीनंतर आज रात्री उशिरा किंवा उद्या काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती आहे. मुंबईत संजय राऊत यांच्यासोबत जागावाटपावरून झालेल्या वादानंतर आज दिल्लीत वरिष्ठ नेत्यांसोबत होत असलेल्या बैठकीला विशेष महत्व आहे.

महाविकास आघाडीत जागावाटपाच्या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नको, अशी भूमिका शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. त्यानंतर महाविकास आघाडीत वाद निर्माण झाला होता. महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मध्यस्थी करुन आघाडीतील नेत्यांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

महाविकास आघाडीची जवळपास सर्व जागांवर चर्चा पुर्ण झाली आहे. काल (रविवारी) ट्रायडंट हॉटेलमध्ये सायंकाळी चार वाजल्यापासून सुरू झालेली बैठक रात्री एक वाजेपर्यंत सुरू होती. काही जागांवरून महाविकास आघाडीमध्ये तिढा होता. याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा आघाडीच्या नेत्यांमध्ये झाली. बैठकीत जवळपास सर्व जागांवर चर्चा पूर्ण झाली आहे. आज किंवा उद्या संयुक्त पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT