Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

MLA Disqualification Case: अपात्रता प्रकरणाच्या निकालापूर्वी राऊतांचं मोठं विधान, म्हणाले, 'मॅच फिक्सिंग...'

Ganesh Thombare

Mumbai News: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरील अंतिम निकाल बुधवारी दुपारी 4 वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार आहेत. या अपात्रता प्रकरणाच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक असतानाच राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवरच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर भाष्य करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप केले आहे.

आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्यापूर्वी राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात भेट झाली होती. या भेटीवर ठाकरे गटाने आक्षेप घेतला. यावर बोलताना राऊतांनी गंभीर आरोप करत 'नार्वेकर मॅच फिक्सिंगसाठी मुख्यमंत्र्यांच्या कॅबिंनमध्ये गेले', असं मोठं विधान राऊतांनी केलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राऊत म्हणाले, 'दीड वर्षापासून महाराष्ट्रामध्ये घटनाबाह्य सरकार काम करत आहे. या सरकारने जे निर्णय घेतले ते सर्व निर्णय बेकायदेशीर आहेत. त्यामुळे संविधान पायदळी तुडवलं जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे काही निर्देश देऊन देखील नार्वेकरांनी सुनावणीवेळी चालढकल केली. त्यांनी या कामांमध्ये आपला राजकीय रंग दाखवला. या सगळ्या गोष्टी आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या रेकॉर्डवर आणल्या आहेत', असंही राऊत म्हणाले.

'विधानसभा अध्यक्षांचा प्रोटोकॉल असं सांगतो की, एखाद्या कामासाठी सूचना देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना पाचारण करतात. विधानसभा अध्यक्ष स्वत: जात नाहीत. मुख्यमंत्र्यांना बोलवतात असा प्रोटोकॉल आहे. पण तुम्ही मॅच फिक्सिंगची डेट आणि मॅच फिक्सिंगसाठी ते मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये गेलात, हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे', असा गंभीर आरोप राऊतांनी केला.

'घटनाबाह्य सरकारचा निकाल आज लागणार आहे, पण निर्णय दिल्लीतून झालेला आहे, फक्त शिक्का मारणं बाकी आहे. मुख्यमंत्री दावोसला जाणार आहेत. कोणत्या खात्रीवर त्यांनी निर्णय घेतला आहे. याचा अर्थ तुमची मॅच फिक्सिंग झालेली आहे. प्रधानमंत्री 'रोड शो'च्या दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री दावोसला जात आहेत, कारण त्यांना निर्णय माहित आहे. नाईलाजाने औपचारिकता म्हणून आज निर्णय दिला जाणार आहे', असं राऊत म्हणाले.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT