Mahavikas Aghadi News  Sarkarnama
मुंबई

Mahavikas Aaghadi News : महाविकास आघाडीतून बाहेर पडून 'एकला चलाे रे'ची भूमिका घ्यावी ! ठाकरे गटाच्या खासदाराचं मोठं विधान

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : वर्षभरापूर्वी शिवसेना पक्षात घडलेल्या राजकीय घडामोडीची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झालेली आहे. यावेळी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पाडली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे पुढील बहुतव्य काय असणार आहे या संदर्भात प्रश्न उपस्थित केला जात असतानाच ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून आता उद्धव ठाकरे यांनी 'एकला चलो रे'ची भूमिका घ्यावी असं म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी त्यांच्या समर्थक 9 आमदारासह मंत्री पदाची शपथ घेतली आहे. 30 आमदारांसह राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या एका खासदाराने तर उद्धव ठाकरे यांनी आता 'एकला चलो रे' ची भूमिका घ्यावी असा सल्ला दिला आहे.

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत(Vinayak Raut) यांनी उद्धव ठाकरे यांना हा सल्ला दिला आहे. राज्यात शिवसेनेने 'एकला चलो रे'ची भूमिका घ्यायला पाहिजे. राज्यातील जनतेची तशी इच्छा आहे असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी फुटणार काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.

राज्यातील राजकीय भूकंपानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी आमदार खासदार आणि राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा होणार आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासह युवानेते आदित्य ठाकरे संजय राऊत, सुभाष देसाई, अनिल परब, सुषमा अंधारे माजी महापौर किशोरी पेडणेकर तसेच मुंबईतील काही प्रमुख पदाधिकारी आणि नेते उपस्थित राहणार आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीपूर्वी खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. ठाकरे गटातून फुटून शिंदे गटात गेलेल्या अनेक आमदारांनी महाविकास आघाडी मधून बाहेर पडावे अशी इच्छा व्यक्त केली होती. शिंदे गट ठाकरे गटामधून कुठून एक वर्ष झाले आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर विनायक राऊत यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचे सूचक वक्तव्य केलं असल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT