Eknath Shinde Aaditya Thackeray Sanjay Raut
Eknath Shinde Aaditya Thackeray Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Thackeray group : ‘गद्दार’, 'खोके' शब्द रुजविल्यानंतर ठाकरे गट पुन्हा आक्रमक ; पण, आमदारांची अनुपस्थिती..

सरकारनामा ब्युरो

Thackeray group Shiv Samvad Abhiyan News : केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी (दि. १७ फेब्रुवारी) शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतला.

पक्षाचे नाव अन् निवडणूक चिन्ह गेल्यानं आता ठाकरे गट कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर ठाकरे गटात सुरु असलेली पडझड थांबवणे हे मोठे आव्हान ठाकरे गटासमोर आहे.

राज्यभरात ठाकरे गटाचे उद्यापासून (शनिवार) शिवसंवाद अभियान सुरु होत आहे. तीन मार्चपर्यंत हे अभियान सुरु असणार आहे.

या अभियानात ठाकरे गटाचे प्रमुख नेते, पदाधिकारी, महिला आघाडी, युवा आघाडीचे पदाधिकारी राज्यात विविध ठिकाणी दौरे करणार आहेत. यापूर्वी झालेल्या शिवसंवाद अभियानात ‘गद्दार’, 'खोके' शब्द रुजविले होते, आता ठाकरे गटाकडून कुठले शब्द रुजविण्यात येणार हे लवकरच समजेल.

२७ तारखेपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्याने या शिवसंवाद अभियानात आमदार सहभागी होणार नाही, असे ठाकरे गटाने सांगितले आहे. या अभियानात जिल्हावार पदाधिकाऱ्याच्या आढावा बैठका घेण्यात येणार आहेत. शाखांची माहिती,पदाधिकाऱ्यांचे रिक्त पदे, स्थानिक प्रश्नांची माहिती या अभियानात घेतली जाणार आहे.

या नेत्यांवर आहे जबाबदारी..

खासदार संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी यांच्याकडे कोल्हापूर, सांगली साता-याची जबाबदारी, सुभाष देसाईंकडे रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गची जबाबदारी, राजन विचारेंकडे ठाणे, पालघरची जबाबदारी, अरविंद सावंतांकडे नागपूर, भंडारा, गोंदिया वर्धा तर अनंत गितेंकडे नाशिक,धुळे,जळगाव व नंदूरबारची जबाबदारी, दिवाकर रावते आणि सुषमा अंधारे यांच्याकडे बुलढाणा,अकोला व अमरावतीची जबाबदारी,चंद्रकांत खैरे आणि ओमराजे निंबाळकरांकडे- चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ व वाशिम जिल्ह्याची जबाबदार तर विनोद घोसाळकरांकडे पुणे, नगर व सोलापूरची जबाबदारी, संजय ऊर्फ बंडू जाधव आणि नितीन बानुगडे पाटील यांच्याकडे नांदेड,लातूर, धाराशीव व हिंगोली जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

निवडणुकीची समीकरणे

‘शिवसंवाद’ च्या पहिल्या टप्प्यात शिवसेनेतील फुटीनंतर ‘ गद्दार’ हा शब्द रुजविल्यानंतर आता पुन्हा ‘शिवसंवाद’ सुरु होत आहे. फुटीनंतर शिवसेनेविषयी वाढलेली सहानुभूती कायम ठेवणे, हे आता नेत्यांसमोरचे आव्हान आहे. यातील काही गावांमध्ये आता नव्याने कोणत्या विषयावर व कसा संवाद होतो यावर निवडणुकीची समीकरणे ठरू शकतील, असे सांगण्यात येत आहे.

आम्ही आंदोलन करु..

शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर दोन्ही गटांकडून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष आनंदोत्सव साजरा करत आहे, तर ठाकरे गटाकडून ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT