Mumbai Political News: "भाजपच्या पलंगावर गेल्यापासून अजित पवारांना सत्काराचं वेड जडलंय, सत्तेची हाव नाही, मग काकांचा पक्ष का फोडला? असा सवाल "सामना"तून केला आहे. "काकांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून का हाकलले? शिंदे-अजित पवारांच्या विकासाची व्याख्या म्हणजे महाराष्ट्राच्या तिजोरीची फसवणूक आणि लूट नाही का? अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे. (Latest Marathi News)
ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या "सामना"तून शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जहरी टीका केली आहे. सरकारच्या कारभारवर बोट ठेवत ठाकरे गटाने सरकारच्या विकासाची व्याख्या सांगितली आहे. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर देखील अग्रलेखातून ताशेरे ओढले आहेत.
कपाटात गेलेल्या फाइली पुन्हा टेबलावर येतील..
"जे आमदार आपल्या गटात नाहीत त्यांना त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी एक फुटकी कवडी द्यायची नाही, अशी बनवाबनवी राज्याचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री करताहेत. सत्तेच्या मस्तवालपणातून जमा केलेल्या गडगंज इस्टेटीवर ईडी , इन्कम टॅक्सचे मुंगळे चढले, ते मुंगळे डसू लागल्यावर भाजपच्या गोठ्यात शिरणाऱ्यांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की, २०२४ मध्ये नक्कीच सत्ताबदल होत आहे. आज कपाटात गेलेल्या फाइली पुन्हा टेबलावर येतील. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या बेइमानांना तेव्हा दया नसेल," अशा शब्दात समाचार घेतला आहे.
कोश्यारींवर निशाणा
"कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या नेत्यांची अशी खिल्ली उडवू नये. महाराष्ट्राच्या राज्यपालपदावर बसून त्यांनी राजकारण केले तो त्यांचा कंडू अद्यापही शमलेला दिसत नाही,"असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे. कोश्यारींनी अजितदादांविषयी केलेल्या वक्तव्यावरून ठाकरे गटाने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.