Suvarna Karanje News : Sarkarnama
मुंबई

Thackeray Vs Shinde : ठाकरे गटातून गळती सुरुच ; मुख्यमंत्र्यांचं टि्वट ; माजी नगरसेविका..

Suvarna Karanje News : संजय राऊतांना अटक झाल्यानंतर त्यांनी शिंदे गटाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.

सरकारनामा ब्युरो़

Mumbai News : राज्यातील सत्तासंघर्षानंतर ठाकरे गटातील सुरु झालेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांच्या गोट्यात दाखल होण्यासाठी पदाधिकारी, आमदार, खासदार नगरसेवकांची रांग लागली. ठाण्यातच ठाकरे गटाला पहिली खिंडार पडली होती.

आता ईशान्य मुंबईतील ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका सुवर्णा करंजे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. करंजे यांच्यासोबत असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी टि्वट करीत माहिती दिली आहे.

माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वात ठाण्यातील ६६ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात जाहीरपणे प्रवेश केला. यामध्ये तीन माजी महापौर, दोन माजी उपमहापौर , माजी स्थायी समिती सभापती, इतर समितीचे सभापती तसेच माजी ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांचा समावेश होता. अजूनही अनेक जण शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे.

सुवर्णा करंजे या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांचे प्रोफाइल पाहिल्यास त्या एप्रिल महिन्यात कांजूर मार्ग येथे झालेल्या राज्य स्तरीय कब्बडी स्पर्धेच्या उद्धाटनावेळी उपस्थित होत्या. आमदार सुनील राऊत यांच्यामार्फत या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. संजय राऊतांना अटक झाल्यानंतर त्यांनी शिंदे गटाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती

उद्धव ठाकरेंची मे महिन्यात महाड येथे सभा झाली होती. या सभेची पोस्ट सुवर्णा करंजे यांनी शेअर केली होती. त्यानंतर काही महिन्यांतच करंजे यांचा शिवसेना, शिंदे गटात प्रवेश होत आहे. शिंदे गटात त्यांनी प्रवेश केल्याचे कारण अद्याप कळू शकले नाही.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT