Thackeray Vs Shinde : Sarkarnama
मुंबई

Thackeray Vs Shinde : शिवसेनेकडे उरले चारच खासदार; प्रतिज्ञापत्र देण्याचे टाळलेले पाचवे खासदार कोण?

Thackeray Vs Shinde : ठाकरेंचा 'तो' खासदार कोण?

सरकारनामा ब्यूरो

Thackeray Vs Shinde : शिवसेनेत फूट पडल्यानंतर बारा खासदार शिंदे गटात सामील झाले. मात्र, अन्य सहाजण उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. काही दिवसांनी गजानन किर्तीकरही शिवसेना गटात सामील झाले. त्यामुळे ठाकरे गटाच्या खासदारांची संख्या सहावरून पाचवर आली. मात्र, निवडणूक आयोगाकडे केवळ चारच खासदारांनी प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत, असे आज स्पष्ट झाले. त्यामुळे प्रतिज्ञापत्र सादर न केलेला पाचवा खासदार कोण अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार शिवसेनेकडे १८ पैकी केवळ चारच खासदार उरल्याचे स्पष्ट झाले असून ऐनवेळी साथ सोडलेले हे खासदार कोण याचा शोध आता घेण्यात येत आहे. परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्याकडे संशयाची सुई दाखविण्यात येत असली तरी निश्‍चितपणे त्यांचे नाव अद्याप पुढे आलेले नाही. आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत निकाल देताना दिलेल्या माहितीत ही बाब पुढे आली असून त्यावरून चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, आयोगाने आज दिलेल्या ७८ पानी निकालपत्रात अनेक बाबी स्पष्ट केल्या आहेत. प्रतिज्ञापत्रांच्या आधारे पक्ष आणि चिन्ह कुणाचे याचा निर्णय करता येत नसल्याने स्पष्ट करून निवडून आलेल्या आमदार, खासदारांना मिळालेल्या मतांचा विचार करून बहुमत शिंदे गटाकडे असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यातील शिवसेनेच्या एकुण खासदारांपैकी सुरवातीला बारा खासदार शिंदे गटात सहभागी झाले होते. त्यानंतर गजानन किर्तीकर यांनी प्रवेश केला. ५५ पैकी ४० आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटात सहभागी झालेल्या खासदार तसेच आमदारांना निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या आधारे शिंदे यांची बाजू बळकट असल्याचे आयोगाने निकालात म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे चाळीस आमदार तसेच अपक्ष दहा अशा पन्नास आमदारांच्या बळावर भारतीय जनता पार्टीसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर त्यांच्याकडे येणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा ओघ आणखी वाढला. एका बाजूला न्यायालयात तसेच दुसरीकडे निवडणूक आयोगात शिवसेना कुणाची यावर वाद सुरू असताना शिंदे यांना पाठिंबा वाढत होता. निवडणूक आयोगाच्या निकालाने शिंदे यांना शिवसेना हा पक्ष आणि धुनष्यबाण हे चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे शिंदे यांची बाजू अधिक भक्कम झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT