Devendra Fadnavis Eknath Shinde sarkarnama
मुंबई

Thane Politics: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात भाजपचं टेन्शन वाढलं; चार जागांवर शिंदे गटाचा डोळा

Assembly Election 2024 Shiv Sena Shinde Group:आगामी विधानसभा निवडणूक कोणाच्या नेतृत्वाखाली लढायची, यावर भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये वाद सुरू आहे. अशा परिस्थितीच मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मात्र भाजपने आपले नेतृत्व जाहीर केले आहे.

Mangesh Mahale

Thane Shiv Sena Shinde Group: लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शिवसेना शिंदे गटाचा आत्मविश्वास वाढला आहे. भाजपच्या ताब्यात असलेल्या भिवंडी, ठाणे, डोंबिवली, कल्याण पूर्वमधील जागांवर शिंदे गटाचा डोळा असल्याचे चित्र आहे.

जागावाटपात या विधानसभा मतदारसंघांवरून वाद होण्याची शक्यता आहे. अशातच भाजपने महायुतीच्या उमेदवांराच्या विजयासाठी आपले नेतृत्व जाहीर करून शिंदे गटालाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी एक वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

आगामी विधानसभा निवडणूक कोणाच्या नेतृत्वाखाली लढायची, यावर भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये वाद सुरू आहे. अशा परिस्थितीच मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मात्र भाजपने आपले नेतृत्व जाहीर केले आहे.

भाजप ठाणे शहर जिल्हाअंतर्गत येणाऱ्‍या ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, कळवा-मुंब्रा आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघात भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या विजयाचा संकल्प करण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचे रणशिंग फुंकण्यात आले. महायुतीच्या उमेदवारासाठी भाजपची संपूर्ण कार्यकारिणी काम करणार आहे. शिवसेना शिंदे गटाला हे नेतृत्व पचनी पडते की पुन्हा वादाची ठिणगी पडते हे लवकरच कळेल.

भाजप महाराष्ट्र प्रदेशच्या महाअधिवेशनानंतर भाजप ठाणे शहर जिल्ह्याच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक खारकर आळीतील महाजनवाडी येथील सभागृहात नुकतीच झाली. लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून खोटे नॅरेटिव्ह प्रस्थापित करण्यात आले होते. त्याचा मुकाबला भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने करून मतदारांना भाजपची भूमिका पटवून द्यावी. लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचवावी, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्याबरोबरच त्यानंतर होणाऱ्‍या महापालिका निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन करण्यासोबतच त्यासाठीची आखणी समजवण्यात आली.

जिल्ह्यातील सर्वाधिक महायुतीच्या जागा जिंकून आणण्याची रणनीतीही आखण्यात आली; पण राज्याचे नेतृत्व करणाऱ्‍या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील पाच जागांचे नेतृत्व भाजप करणार असल्याचे सूतोवाच या सभेत करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, ठाणे लोकसभा विस्तारक जयप्रकाश ठाकूर, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, ठाणे शहर विधानसभा प्रमुख सुभाष काळे, ओवळा-माजिवडा विधानसभा प्रमुख मनोहर डुंबरे, सरचिटणीस मनोहर सुगदरे, सचिन पाटील, संदीप लेले, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले बैठकीला उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT