Jitendra Awhad, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Thane Loksabha Election 2024: ठाण्यात राजन विचारेंविरोधात शिंदे कोणाला मैदानात उतरवणार? आव्हाडांनी सांगितलं 'हे' नाव

Pankaj Rodekar

Thane News : ठाणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार अद्यापही निश्चित होत नाही. मात्र, त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी मला खात्री आहे, प्रताप सरनाईक यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे खात्रीदायक विधान केले. तसेच माझी मनापासून इच्छा आहे सरनाईकांना तिकीट मिळावे, असे मत त्यांनी शुक्रवारी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

ठाण्यातील महायुतीच्या जागावाटपाबद्दल विचारले असता, दुसरा काय करतो, त्यांच्याकडे मी लक्ष देत नाही. तसेच त्यांच्या उमेदवारावर भाष्यही करत नाही. पण सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी ठाण्यातील बंगल्यावर मीटिंग सुरू असतात. बंगल्यातून बाहेर येताना सर्वजण हसत येतात आणि नंतर फोनाफोनी सुरू होते. त्यामुळे त्यांच्या घरात काय चालले आहे, याचे काय करायचे मला माझे घर चांगले ठेवायचे आहे, असे या वेळी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले.

प्रताप सरनाईक यांना उमेदवारी मिळेल अशी मला खात्री आहे. याशिवाय माजी आमदार रवींद्र फाटक असो या आमदार प्रताप सरनाईक या प्रत्येकाला निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा अधिकार आहे. याशिवाय उमेदवारी मागणे चुकीचे नाही, असेही आव्हाडांनी या वेळी सांगितले. माझी मनापासून इच्छा आहे, सरनाईक यांना लोकसभेची तिकीट मिळावी. असे बोलून आव्हाडांनी राजकीय विरोधक असताना सरनाईकांवरील मित्रप्रेम बोलण्यातून दाखवून दिले.

एकीकडे महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर करून प्रचाराला सुरू झाली आहे. मात्र महायुतीकडून अद्यापही उमेदवाराचे नाव घोषित होत नसताना, पण, मेळावे घेण्यास सुरुवात झाली. त्यातच भाजप असो या शिवसेना (शिंदे) हे दोन्ही पक्ष अजूनही या मतदारसंघावर दावा करताना दिसत आहेत.

तसेच या आठवड्यात उमेदवार जाहीर होईल असे म्हटले जात असताना, आव्हाडांनी खात्रीदायक विधान करून प्रताप सरनाईक(Pratap Sarnaik) हेच उमेदवार असे म्हणून महायुतीच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. आता तरी महायुती उमेदवाराचे नाव कधी जाहीर करणार हेच पाहावे लागणार आहे. तसेच सरनाईक यांना उमेदवारी जाहीर झाल्यास उमेदवारीचा पेपर फुटला असेच म्हणावे लागणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिंदे युद्धात जिंकलात पण...

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांबद्दल मला वाईट वाटते. दोघे महाराष्ट्राचे दादा होते. लोकसभा तिकीट वाटपात जे शिंदेंचे झाले तेच दादांचे झाले आहे. दुसरीकडे शिंदे हे युद्ध जिंकले असे म्हणतात. पण, तुम्ही युद्धात जिंकलात पण तहात हारला.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT