Thackeray group Leader Anita Birje Joins Shinde Group Sarkarnama
मुंबई

Anita Birje: ठाण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; आनंद दिघेंच्या तालमीत तयार झालेल्या अनिता बिर्जे शिंदे गटात

Mangesh Mahale

ठाण्यात एकीकडे ठाकरे गटाचा मेळावा सुरू असताना त्याच वेळी ठाणे जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाणे जिल्ह्याच्या ठाकरे गटाच्या (Anita Birje) महिला जिल्हा प्रमुख अनिता बिर्जे (Anita Birje) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. धर्मवीर आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेल्या आक्रमक शिवसैनिक म्हणून अनिता बिर्जे यांची ओळख आहे.

राजकारणासाठी नाही तर समाज सेवेसाठी मी हा प्रवेश करीत असल्याचे अनिता बिर्जे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर सांगितले. माझा भाऊ आज मुख्यमंत्री आहे. त्यामुळे माझा या भावाचा उपयोग तळागाळातील सर्व महिलांना झाला पाहिजे, असे अनिता बिर्जें म्हणाल्या.

पक्षप्रवेश सोहळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. अनिता बिर्जे यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली आगामी काळात शिवसेना अधिक जोमाने काम करेल, असे त्यांनी म्हटलं आहे.

'शिवसेनेच्या जडणघडणीच्या कालखंडात सौ.अनिता ताई बिर्जे यांनी तत्कालीन शिवसैनिकांच्या साथीने शिवसेनेची महिला आघाडी तळागाळात पोहचवली होती. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेला नवीन बळ मिळाले आहे. त्यांच्या अनुभवी नेतृत्वात आगामी काळात शिवसेना अधिक जोमाने काम करेल,'असे मुख्यमंत्री शिंदे यांनी एक्सवर म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT