UBT MNS Workers Clash: Sarkarnama
मुंबई

Video Rajan Vichare: 'मर्द असाल तर समोर या! ठाण्यातील राड्यानंतर राजन विचारे यांचे मनसेला ओपन चॅलेंज

Mangesh Mahale

ठाण्यात ठाकरे गटाच्या मेळाळ्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी राडा केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. आता ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) नेत्यांकडून प्रत्युत्तर येण्यास सुरवात झाली आहे.'मर्द असाल तर समोर या,'असा थेट इशारा ठाकरे गटातील माजी खासदार राजन विचारे (Rajan vichare) यांनी मनसैनिकांना दिला आहे. मनसैनिकांवर राजन विचारे यांनी संताप व्यक्त केला आहे.

ठाकरे यांच्या मेळाव्यात मनसैनिकांनी शनिवारी रात्री गोंधळ घातला होता, त्यावर आता राजन विचारे आणि आक्रमक पवित्रा घेतला आहे. महिलांना पुढे करुन हा प्रकार केला गेला. तो निंदनीय आहे. आमचा कार्यक्रम होता म्हणून आम्ही शांत होतो. तुमच्यात दम असेल तर समोर या, पळता कशाला? असा सवाल राजन विचारे यांनी मनसेला केला केला. शिवसैनिक अशा प्रकारला उत्तर द्यायला नेहमीच तयार असतात, असेही राजन विचारे म्हणाले.

शनिवारी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात मेळावा आयोजित केला होता. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह खासदार संजय राऊत आणि अनेक महत्वाचे नेते रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान ठाण्यात दाखल झाले होते. यावेळी उद्धव ठाकरेंच्या गाड्यांच्या ताफ्यावर मनसैनिकांनी (MNS) शेण आणि बांगड्या फेकल्या होत्या.

ठाण्यात गडकरी रंगायतनात झालेल्या राड्यावरुन मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसैनिकांना व्हिडिओ कॅाल करुन त्यांचे कौतुक केले आहे. त्यामुळे मनसैनिकांनी पोलिस ठाण्यामध्येच जल्लोष केला.ठाण्यात राडा करणाऱ्या 46 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे, शरद पवार यांचे विधानसभेच्या तोंडावर मनोज जरांगे यांच्या आडून राजकारण सुरु असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) केला आहे. माझ्या दौऱ्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला आहे. आताच सांगतो माझ्या वाटेला जाऊ नका, नाहीतर सभाही घेता येणार नाही, माझी पोर काय करतील हे सांगता येत नाही असे म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे, शरद पवारांना इशारा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT