Thane News  Sarkarnama
मुंबई

Thane Political News : 'मुंब्रादेवी' पाणी टंचाईविरोधात पेटली 'मशाल'; ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर...

Shivsena Uddhav Balasaheb Thackeray News : मागील दहा वर्षांत भीषण पाणीटंचाईचा सामना मुंब्रादेवी कॉलनीतील रहिवासी करत आहेत.

Pankaj Rodekar

Thane News : एकीकडे महापालिका आयुक्तांनी पाणी चोरीविरोधात दंड थोपटले असताना, दुसरीकडे मुंब्रादेवी कॉलनीतील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, या भागात प्रचंड समस्या असून मागील दहा वर्षांत भीषण पाणीटंचाईचा सामना मुंब्रादेवी कॉलनीतील रहिवासी करत आहेत. या समस्यांना वाचा फोडण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली असून, आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे. (Latest Marathi News)

मुंब्रादेवी कॉलनी परिसरातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कटिबद्ध आहे. जिथे नागरिकांवर अन्याय होत असेल तिथे शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असेही दिवा संघटक रोहिदास मुंडे यांनी व्यक्त केले आहे. अशाप्रकारे नागरिक समस्या घेऊन पुन्हा एखादा शिवसेना ठाकरे गटाने शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

दिव्यातील दोन जलकुंभ गेले 10 ते 12 वर्षांपासून बंद आहेत. त्यांना स्मारक म्हणून घोषित करा, अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेने केली आहे. त्यातच दिव्यातील पाणी चोरी रोखण्याबाबत विशेष पथक नेमले आहेत. तसेच या चोरट्यांवर 353 नुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश गुरुवारी अर्थसंकल्पासंदर्भात बोलताना आयुक्त अभिजित बांगर यांनी सूचना केल्याची माहिती दिली आहे.

तर दुसरीकडे मुंब्रादेवी कॉलनी परिसरातील (Thane News) नागरिकांना प्रचंड पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या भागातील नागरिकांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागते. टँकरने पाणीपुरवठा होत असलेल्या नागरिकांचे आर्थिक गणित मागील काही वर्षांपासून बिघडलेले आहे. नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

दुसरीकडे या भागात ड्रेनेज समस्या मोठ्या प्रमाणात असून, कचऱ्याची समस्यादेखील मुंब्रादेवी कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणात आहे. मौसम थिएटर ते वारेकर शाळा या भागात फूटपाथवरून चालताना नागरिकांना दुखापती झाल्याच्या घटना घडल्या आहेत. गटारांची झाकणे तुटलेली आहेत. त्याचबरोबर फूटपाथ हे फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना रस्त्याच्या मधून चालावे लागते, यामुळे अपघातांचा धोका निर्माण होतो.

या सर्व समस्यांना वाचा फोडण्यासाठी व महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाच्या वतीने मुंब्रादेवी कॉलनी परिसरात निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले आहे. त्यामुळे शिंदे गटाला एकप्रकारे ठाकरे गटाने डिवचणे सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT