Uddhav Thackeray & Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Thane Politics : शिंदे गटाकडून पुन्हा ठाकरे गटाला सुरुंग; नेमणूक केल्यानंतर भास्करराव म्हणतात, 'मी तर शिंदे गटात'

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी 'मिशन ठाणे'ची घोषणा केली

सरकारनामा ब्युरो

Thackeray- Shinde Dispute : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी 'मिशन ठाणे'ची घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हरवण्यासाठी ठाकरे गट हालचाली करत असतानाच दुसरीकडे मात्र शिंदे गटानेच ठाकरे गटाच्या गडाला पुन्हा सुरुंग लावल्याचे दिसत आहे.

उद्धव ठाकरेंनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पदांवर अनेक पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. ठाणे विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी पाड्यातील भास्कर पाटील यांची निवड करण्यात आली. पण आता भास्कर पाटील यांनी आपण एकनाथ शिंदे यांच्या गटात असल्याचे जाहीर केले आहे. भास्कर पाटील यांनी मंगळवारी १७ जानेवारी रोजी थेट आनंद मठात जाहीर पत्रकार परिषदेत याबाबत खुलासा केला. यामुळे पुन्हा एकदा शिंदे गटाने ठाकरेंच्या गडाला सुरुंग लावल्याचे पाहायला मिळत आहे.

असे असतानाच भास्कर पाटील यांच्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्षात वादाची ठिणगी पडली आहे. गेले दोन दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे आणि शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के भास्कर पाटलांवरून आमनेसामने आले आहे. दैनिक सामना'च्या मुखपत्रातून ठाणे विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी भास्कर पाटील यांची निवड करण्यात आली. पण, यावरुन ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. ' शिंदे गटाकडून भास्कर पाटील यांच्यावर दबाव टाकला जात आहे. त्यांना खोट्या गुन्ह्याची भीती दाखवत शिंदे गटाने जबरदस्तीने आपल्या गटात सामील करुन घेतले असल्याचा आरोप विचारे यांनी केला.

तसेच, नारायण राणेंनी शिवसेना सोडली तेव्हा, नरेश म्हस्के शिंदेंच्या जाचाला कंटाळून काँग्रेसमध्ये चालले होते. पण आपणच त्यावेळी त्यांना शिवसेनेत थांबवल्याचा दावा राजन विचारे यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान विचारे यांच्या आरोपांवर राज्यातील सत्तांतर झाल्याच्या पहिल्या दिवसांपासून भास्कर पाटील शिंदे गटात असल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर भास्कर पाटील यांची शिंदे गटाच्या ठाणे शहर विधानसभा समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आल्याचेही यावेळी म्हस्के यांनी स्पष्ट केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT