Mumbai CST
Mumbai CST Sarkarnama
मुंबई

बॉम्बने मुंबई उडवण्याची धमकी देणाऱ्या 'त्या' तरूणाला अटक

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : बॉम्बस्फोट करून मुंबई उडवण्याची धमकी देणाऱ्या तरूणाला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 9 ने अटक केली. रणजीत कुमार सहानी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, तो मूळ बिहारचा रहिवासी आहे. तो २५ वर्षांचा आहे.

सहानी याने बॉम्बस्फोट करून मुंबई उडवण्याची आणि भारतात हाहाकार माजवण्याची धमकी देत ​​व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल केला होता. कॉल केला तेव्हा तो हैदराबाद येथे होता. धमकीचा कॉल केल्यानंतर ट्रेनमध्ये चढला आणि तो मुंबईच्या दिशेने निघून आल्याची माहिती आहे.

क्राइम ब्रँचच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनमधून चढून तो मुंबईत पोहोचताच त्याचा शोध घेण्याचे काम गुन्हे शाखेने सुरू केले. मोबाइल लोकेशनच्या मदतीने सहानीला दक्षिण मुंबईतील चर्नीरोड या परिसरातून अटक करण्यात आली. सहानी याने सांताक्रूझ येथे राहणाऱ्या रफत हुसेन नावाच्या व्यक्तीला व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल केला आणि त्याला ‘बॉम्बस्फोट करना है इंडिया में विनाश है’असे सांगितले होते.

या धमकीच्या फोन कॉलनंतर एका राजकीय पक्षाच्या पदाधिकारीऱ्याने याची, मुंबई पोलिसांना माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तक्रार घेऊन व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल करणाऱ्या तरूणाविरुद्ध भादंवि कलम ५०६(२) अन्वये गुन्हा दाखल केला, गुन्हे शाखा या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT