Tejaswini Pandit Sarkarnama
मुंबई

Tejaswini Pandit Blue Tick : टोलवरून फडणवीसांना प्रश्न विचारणाऱ्या तेजस्विनी पंडित यांचे 'ब्लू टिक' गायब!

Tejaswini Pandit Blue Tick Removed : 'वर्षानुवर्षे लोकांची फसवणूक करणाऱ्यांबद्दल बोललो तर...'

Chetan Zadpe

Mumbai News : मराठी सिने-अभिनेत्री तेजस्विनी पंडित या नेहमीच आपल्या परखड मतांमुळे चर्चेत असतात. नुकतंच महाराष्ट्र नवनिर्माण सेना टोल प्रश्नावरून आक्रमक झाली आहे. याच अनुषंगाने तेजस्विनी पंडित यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक जुना व्हिडिओ ट्विट केला होता.

यानंतर आता तेजस्विनी यांचे ट्विटर (आताचे X) अकाउंटचे 'ब्लू टिक' काढले गेले आहे. एक्सकडून व्हेरिफाइड अकाउंट्सना ब्लू टिक दिली जाते. या प्रकारामुळे आता तेजस्विनी यांनी संताप व्यक्त करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. (Latest Marathi News)

'कोंबडं कितीही झाकल्याने सूर्य काही उगवायचा राहत नाही,' अशा सूचक शब्दांत त्यांनी एक पोस्ट केली आहे. “माझ्या एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया अकाउंटचं व्हेरिफिकेशन राजकीय दबाव आणून काढून टाकलं. याचं कारण काय तर लोकांना माझं स्पष्टपणे व्यक्त होणं सहन होत नाही. वर्षानुवर्षे लोकांची फसवणूक करणाऱ्यांबद्दल बोललो, प्रश्न उपस्थित केला म्हणून असा राजकीय दबाव आणला गेला.

'ब्लू टिक' हा सन्मान असेल तर योग्य कारणांसाठी जाणं हा त्याहून मोठा सन्मान आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवादच, पण अशा बंदीने माझा आणि जनतेचा आक्रोश कमी होणार नाही. सामान्य लोकांचा आवाज बंद करणे हाच यांचा 'X' फॅक्टर आहे, असं स्पष्ट होत आहे. असो, पण माझा जय हिंद आणि जय महाराष्ट्रसाठीचा घोष योग्यवेळी सुरूच राहील, अशा शब्दांत तेजस्विनी यांनी ठणकावले आहे.

काय म्हणाल्या होत्या तेजस्विनी पंडित?

देवेंद्र फडणवीस यांच्या टोलवरील भाष्याबाबत एक व्हिडिओ ट्विट करत तेजस्विनी पंडित म्हणाल्या, "म्हणजे? यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलताहेत ? मग इतकी वर्षे आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय ? राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा या टोल धाडीतून."

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT