Sharad Pawar Resign
Sharad Pawar Resign  Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar Resign: शरद पवारांच्या राजीनाम्या संदर्भात राष्ट्रवादीची समिती घेणार मोठा निर्णय

सरकारनामा ब्युरो

Sharad Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्या संदर्भांत मोठी अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत आज खासदार प्रफुल्ल पटेल शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा प्रस्ताव ठेवणार आहेत. सकाळीं 11 वाजता राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात बैठकीत आज 16 सदस्यांची बैठक होणार आहे. (The committee of NCP will take a big decision regarding Sharad Pawar's resignation)

मुंबईतील वाय. बी चव्हाण सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात शरद पवार (Sharad Pawar) यांनी अचानक राष्ट्रवादी कॉंग्रेसचत अध्यक्ष पदावरून पायउतार होण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयामुळे संपूर्ण सभागृहात एकच खळबळ माजली. सभागृहात जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांपासून राष्ट्रवादी च्या सर्व आजी-आजी नेत्यांनीही त्यांच्या राजीनाम्या ला विरोध केला.

शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा करताना नव्या अध्यक्षाची नियुक्ती करण्यासाठी एका समितीची घोषणा केली होती. यात राष्ट्रवादी च्या काही तरुण आणि ज्येष्ठ नेत्यांचीही नावे होती. आता हीच समिती आज बैठकीत त्यांच्या राजीनामा नामंजूर करण्याचा प्रस्ताव देणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. राज्यप्रमाणेच सांगोला तालुक्यातील खिलारवाडी सारख्या ग्रामीण भागातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा, यासाठी स्वत:च्या रक्ताने पत्रच लिहिले.

शरद पवार यांच्या या निर्णयानंतर राज्यातून नव्हे तर देशभरातील नेते त्यांना अध्यक्षपदी राहण्याची विनंती करत आहेत. जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, द्रमुकचे नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, माकपचे नेते सीताराम , आम आदमी पार्टीचे संजय सिंग,सीपीआयचे डी. राजा यांंनीही शरद पवार यांना फोन करत त्यांना अध्यक्षपद न सोडण्याची विनंती केली आहे.

राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची एकजूट करण्यासाठी शरद पवार हेच नाव अग्रणी असल्यामुळे त्यांनी राजीनाम्याचा विचार मागे घ्यावा, असं विरोधी पक्षांचे मत आहे. त्यामुळे आता शरद पवार आता काय निर्णय घेणार याकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT