Anil Deshmukh
Anil Deshmukh  
मुंबई

अनिल देशमुखांना झटका: खासगी रुग्णालयात उपचाराला न्यायलयाचा नकार

सरकारनामा ब्युरो

Anil Dehmukh latest news update

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil deshmukh) यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. खासगी रुग्णालयात अनिल देशमुख यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी परवानगीसाठी त्यांच्या वतीने न्यायालयात अर्ज सादर करण्यात आला होता. मात्र अनिल देशमुखांच्या या अर्जावर सुनावणी करताना कोर्टाने त्यांना खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता त्यांना जे. जे. रुग्णालयातच उपचार आणि शस्त्रक्रिया होणार आहे. तसेच त्यांच्यावर उपचार सुरू असताना देशमुख परीवारातील कोणती व्यक्ती त्यांच्यासोबत थांबेल याचे नाव न्यायालयाने द्यायला सांगितले आहे.

अनिल देशमुख यांनी केलेल्या अर्जानंतर ईडीने न्यायालयासमोर देशमुखांचा वैद्यकीय अहवाल सादर केला. या अहवालच निर्णायक ठरला. देशमुखांनी खासगी रुग्णालयात उपचारांची गरज नाही, जेजेतही उपचार होऊ शकतात, असं ईडीनं म्हटलं होतं. देशमुख यांना खांदेदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे खांद्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली होती. जे.जे. रुग्णालयात अद्ययावत सोयी सुविधांचा अभाव असल्याने आणि त्यांचे वाढते वय पाहता खासगी रुग्णालयात उपचाराची परवानगी देण्यात यावी अशी मागणी देशमुखांनी न्यायालयाकडे केली होती.

मात्र ईडीनं याला विरोध करत देशमुखांवर तातडीनं शस्त्रक्रिया करण्याची गरज नसल्याचा वैद्यकीय अहवाल कोर्टात सादर केला. तसेच खासगी ऐवजी जे.जे. रुग्णालयातही ही शस्त्रक्रिया होऊ शकते, असाही ईडीनं दावा केला होता. मात्र इडीच्या अहवालाच्या आधआरे न्यायालयाने त्यांना जे.जे. रुग्णालयातच शस्त्रक्रिया करण्यास कोर्टानं परवानगी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT