Sanjay Raut  Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : तर त्याने तुमचा पोटशूळ का उठला? न्यायालयाने मुंबई पोलिसांनाच फटकारलं...

Sanjay Raut : संजय राऊत न्यायालयीन कोठडी संपली असतानाही त्यांना न्यायालयात सुनावणीसाठी हजर केले जाते.

सरकारनामा ब्युरो

Sanjay Raut News Update| मुंबई : पत्राचाळ पुनर्विकास घोटाळय़ाप्रकरणी खासदार संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहेत. कल त्यांना सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने मुंबई पोलिसांना चांगलेच फटकारलं.

संजय राऊत यांना काल विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी, न्यायालयाबाहेर त्यांचे समर्थक आणि हितचिंतक त्यांना भेटण्यासाठी येत असतील. ते स्वत: प्रसारमाध्यमांसमोर राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर बोलत असतील तर या सगळ्याची तुम्हाला चिंता का? तुमची नेमकी अडचण काय आहे? असा थेट सवाल न्यायालयाने मुंबई पोलिसांना विचारला. तसेच, या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास आणि आदेश देण्यासही स्पष्ट नकार दिला.

संजय राऊत न्यायालयीन कोठडी संपली असतानाही त्यांना न्यायालयात सुनावणीसाठी हजर केले जाते. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलतात म्हणून राज्य सरकारने पोलीस अधिकाऱ्यांवर ही टीका केली होती. त्यानंतर कुलाबा पोलिसांनीही शुक्रवारी विशेष न्यायालयाकडे याबाबत तक्रार केली होती. पण न्यायालयाने पोलिसांनाच तुम्हाला नेमकी अडचण काय? यावर राऊत हे प्रसिद्धीमाध्यमांशी बोलल्याने आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

पण राऊत या प्रकरणांवर काही बोलत असतील आणि त्यामुळे ईडीच्या तपासात अडथळे येत असतील तर ईडीने त्याबद्दल तक्रार करावी. पण राऊत यांनी राजकीय मुद्दय़ांवर काही बोलले तरी त्याला हरकत घेऊ नये. राजकीय सूडबुद्धीतून हे प्रकरण दाखल केले नसल्याचा ईडीचा दावा आहे. त्यामुळे राऊत राजकीय मुद्दय़ांवर बोलत असतील तर त्याने तुमचा पोटशूळ का उठला, असा सवालही न्यायालयाने पोलिसांना विचारला.

याचवेळी न्यायालयाने सुरक्षेच्या मुद्दय़ावरूनही पोलिसांना खडसावलं. संजय राऊतांनी भेटण्यासाठी येणारे गोळीबार करणार आहे का? राऊतांना न्यायालयाच्या बाहेर त्यांचे समर्थक येत असतील तर न्यायालय यासाठी काहीच करू शकत नाही, असेही न्यायालयाने म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT