Mumbai News : बिहारमधील पाटणा आणि कर्नाटकातील बंगळुरू येथील बैठकीनंतर भाजपविरोधी पक्षांनी आपल्या आघाडीला 'इंडिया' (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायंस) असे नाव दिले. 'इंडियाची पुढची बैठक आता मुंबईमध्ये पार पडणार आहे. यासाठी तयारी करण्यात येत असून, बैठकीची तारीख आणि वेळ निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)
बंगळुरू येथे विरोधी पक्षांची बैठक पार पडली होती. यानंतर पुढील बैठक मुंबईत पार पडेल असे जाहीर करण्यात येत आले होते. मुंबईच्या या बैठकीची तयारी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात येणार असल्याचे समजते. याच संदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार आज दिल्लीवरून मुंबईत दाखल होणार आहेत. आज काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोल त्यांची भेट घेणार आहेत.
मुंबईतल्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकीबाबत ही भेट होणार असल्याचे समजते. पवार आणि काँग्रेस नेत्यांच्या भेटीत आगामी बैठकीसाठी आढावा घेण्यात येणार असल्याचे समजते. तसेच, आगामी निवडणुकींच्या तयारी कशी असावी, याबाबतही चर्चा करण्यात येणार आहे. तसेच विधानसभेतील विरोधीपक्षनेतेपदा बाबतही महत्त्वाची चर्चा होणार आहे. इंडियाची २५ आणि २६ ऑगस्ट रोजी बैठक होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.