Eknath Shinde Devandra Fadnavis Latest News
Eknath Shinde Devandra Fadnavis Latest News Sarkarnama
मुंबई

मला उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय धक्कादायक होता : देवेंद्र फडणवीस

सरकारनामा ब्यूरो

पुणे : "मी मुख्यमंत्री बनणार नाही हे ठरलं होत. शिंदेंना मुख्यमंत्री करावं हा प्रस्ताव माझा होता. मला बाहेर राहायचं होत, तसे वरिष्ठांना मी सांगितलं होत. पण त्यांनी मला उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला सांगितलं, हे माझ्यासाठी धक्कादाय होता. मात्र नंतर मला जाणीव झाली की वरिष्ठांचे घेतलेला निर्णय योग्य होता," असा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांनी साम टिव्हीशी बोलताना हे वक्तव्य केलं आहे. (Eknath Shinde Devandra Fadnavis Latest News)

फडणवीस म्हणाले, मी मुख्यमंत्री होणार नाही हे मला माहित होते. पण माझ्यासाठी धक्कादायक निर्णय म्हणजे उपमुख्यमंत्री पद स्विकारायला सांगितले हा होता. मात्र नंतर त्यांनी घेतलेला निर्णय हा योग्य होता याची जाणीव मला झाली. सरकारच्या बाहेर राहुन चालत नाही, असे फडणवीस म्हणाले.

एक वेळ अशी होती की, त्यावेळी राष्ट्रवादी आमच्या सोबत येण्यास इच्छुक होती. पण आमचे वरिष्ठ म्हणाले की तुम्ही सोबत या मात्र आम्ही शिवसेनेला सोडणार नाही. तर एक परसेप्शन असेही आहे की, काँग्रेसचे काही नेते आमच्याकडे येऊ शकतात. राजकारणात काहीही अशक्य नाही पण आता त्यांच्याशी बोलण सुरू नाही, असा गौप्यस्फोटही फडणवीसांनी यावेळी केला.

पुढे ते म्हणाले, माझ्यासोब बेईनामी केल्याचा मी बदला घेतला आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी स्वतःचे नुकसान करून घेतले आहे. माझी आणि उद्धव ठाकरे यांची वैयक्तिक दुष्मनी झालेली नाही. आम्ही राजकीय दृष्ट्या दूर गेलो असून आता मनानेही एकत्र येणार नाही. आता आम्ही कधीही एकत्र येणार नाही, असेही फडणवीसांनी (Devendra Fadnavis) स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT