Manisha Kayande, Sushma Andhere Sarkarnama
मुंबई

Manisha Kayande On Sushma Andhare : नकली हिंदुत्ववाले ठाकरे गटाचा चेहरा; मनिषा कायंदेंचा अंधारेंवर निशाणा

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : पक्ष सोडताना कुणी विचारलेही नाही, कायंदेंची खंत

सरकारनामा ब्यूरो

Sushma Andhare Vs Manisha Kayande : शिवसेना उद्धव ठाकरे गटाला शुक्रवारी (ता. ७) पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे विधानपरिषेदेवरील आमदार नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. माध्यमात पक्षाची बाजू मांडणाऱ्या नेत्या म्हणून नीलम गोऱ्हे या परिचित होत्या. विधान परिषेदेवरील आमदार मनिषा कायंदे यांच्यानंतर नीलम गोऱ्हे यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. (Latest Political News)

गोऱ्हे यांच्या पक्षांतरांनतर आमदार मनिषा कायंदे यांनी शिवसेना (ठाकरे गट) का सोडली याबाबत जाहीर भाष्य केले. त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी पक्ष सोडावा लागल्याची खंतही व्यक्त केली. यावेळी त्यांनी नाव न घेता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा आंधारे यांच्यावर निशाणा साधला. तसेच राज्यामधून जिल्हा-जिल्ह्यातील महिला शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावाही यावेळी कायंदे यांनी केला.

कायंदे म्हणाल्या, "मी शिवसेनेतच होतो, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत काम करत आहोत. ही शिवसेना बाळासाहेबांची आहे. हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाणारी ही शिवसेना आहे. आज नीलम गोऱ्हे यांनीही शिंदेचे नेतृत्व स्वीकारले. शिवसेनेत येण्यासाठी जिल्ह्या-जिल्ह्यातील महिला येण्यासाठी उत्सुक आहेत."

यावेळी मनिषा कायंदे यांनी ठाकरे गट का सोडला, याचेही कारण स्पष्ट केले. कायंदे म्हणाल्या, जे हिंदुत्व शिवसेनेचे आहे, त्याला अलिकडच्या काळात धक्का बसला. २०१२ मध्ये शिवसेनेत आले मात्र माझी हिंदुत्वाची विचारधारा सोडली नाही. मात्र काही नकली हिंदुत्ववाले पक्षात येऊन स्वतःचीच टिमकी वाजवत होते. नवीन काहीतरी हिंदुत्व आणत होते. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवली असे लोक आता शिवसेनेचा चेहरा बनत आहेत. त्यामुळे आम्ही तिथे कसे राहायचे? त्यामुळेच आम्ही हा मार्ग निवडला."

पक्ष सोडताना कुणीही विचारणा केली नसल्याची खंतही यावेळी मनिषा कायंदे यांनी व्यक्त केली. मनिषा कायंदे म्हणाल्या, आम्ही पक्ष सोडतानी कुणी विचारले नाही. आमच्या मानात नेमके काय दुःख आहे, याबाबतही कुणाकडून विचारला झाली नाही. याचेच जास्त दुःख आमच्या मनात आहे."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT