Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

घुसखोरी करणाऱ्या कन्नडिगांना महाराष्ट्र सरकारचाच छुपा पाठिंबा ; Sanjay Raut Allegation

महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर अशा प्रकारचं धाडसं कोणी केलं नव्हत.

सरकारनामा ब्युरो

Maharashtra- Karnatak Border Dispute : ज्या पद्धतीने परकीय शक्तींनी आपल्या काश्मीरमध्ये येऊन आपल्या काश्मीरमध्ये त्यांचे झेंडे फडकवले आणि काश्मीर आमचा आहे म्हणाले, त्याच पद्धतीने हे लोक महाराष्ट्रात घुसलेत, असा धक्कादायक आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. तसेच, या सर्वांवर राजद्रोहाचे गुन्हे दाखल व्हायला हवेत. अशी मागणीही राऊत यांनी केली आहे.

२०१८ मध्ये केलेल्या भाषणावरुन माझ्यावर आता गुन्हे दाखल होतात आता वॉरंट पाठवतात. याच्यावरही राज्य सरकारने स्पष्टीकरण दिले पाहिजे, माझी लढाई ही व्यक्तिगत नव्हती ती महाराष्ट्रासाठी होती. आता तर पुन्हा महाराष्ट्रावरील हल्ले वाढले आहेत. विशेषत: गेल्या तीन महिन्यात हे सरकार अस्तित्त्वात आल्यापासून हे आक्रमण जास्तच वाढलं आहे. याचा परिणाम फार वेगळा होईल, यात आम्हाला गांभीर्याने लक्ष घालावे लागेल. विशेष म्हणजे तिथे बोलवून मला मारण्याचा कट असल्याचा दावाही राऊत यांनी केला आहे.

कन्नड वेदिके संघटनेने सांगलीतील जत जिल्ह्यात घुसखोरी करत झेंडे फडकवले आणि घोषणाबाजी केल्याने राज्यात राजकारण तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री शंभुराजे देसाई यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. कन्नड वेदिकेचे लोक महाराष्ट्रात येतात, त्याचे झेंडे लावतात, हे कर्नाटक सरकारच्या पाठिंब्याशिवाय करु शकत नाहीत हे महाराष्ट्र सरकारमधल्या लोकांचा छुपा पाठिंबा असल्याशिवाय हे होणार नाही, असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, जर असं घडलं असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी समोर येऊन सरकारची भूमिका स्पष्ट केली पाहिजे.

महाराष्ट्रात घुसखोरी केलेल्या या लोकांचं काय करणार आहात, तुम्ही परत ते गुळगुळीत धोरण स्विकारणार आहात की, हात चोळत बसणार आहात दिल्लीकडे बघत बसणार आहात की नवस फेडायला पुन्हा गुवाहाटीला जाणार आहात. असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर अशा प्रकारचं धाडसं कोणी केलं नव्हत. पण एक दुबळं आणि मानसिकदृष्ट्या अपंग सरकार या राज्यात सत्तेवर बसलं आहे, त्यांना पाठीचा कणा नाही, स्वाभिमान ननाही, महाराष्ट्राचा अभिमान नाही. अशा सरकारकडून या राज्याच रक्षण होईल असं वाटत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT