Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray sarkarnama
मुंबई

Chandrashekhar Bawankule Reply : 'सामना'ची आग विझवावी लागेल...; बावनकुळेंचा ठाकरेंना इशारा

Thackeray-BJP Politics : दैनिक सामना वृत्तपत्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आल्याने भाजप आता चांगलीच आक्रमक झाली आहे

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: दैनिक सामना वृत्तपत्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आल्याने भाजप आता चांगलीच आक्रमक झाली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट, 'सामना ज्या पद्धतीने आग ओकत आहे ती आग विझवावीच लागेल,' असा अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे.

मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाला इशाराच दिला आहे. " सामना वृत्तपत्राविरोधात आमचे मुंबईचे नेते आणि कार्यकर्ते याविरोधात लढा देणार आहेत. यातून आंदोलनाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. सामना ज्या पद्धतीने आग ओकत आहे ती आग विझवावीच लागेल. वृत्तपत्रांना जे स्वातंत्र्य दिलं गेलं आहे ते नियमाच्या बाहेर जाऊन लिहीत असतील तर ते खपवून घेणार नाही. असा एकप्रकारे इशाराच बावनकुळेंनी दिला आहे.

सामना वृत्तपत्राविरोधात आमचे मुंबईचे नेते आणि कार्यकर्ते याविरोधात लढा देणार आहेत. यातून आंदोलनाची परिस्थितीही निर्माण होऊ शकते.तसेच एखाद्या वृत्तपत्राला परवानगी मिळाली म्हणून त्यांना एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक गोष्टींबद्दल टीका टिप्पणी करण्याचा अधिकार नाही. त्याबाबत आम्ही लवकच आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत. सामनाचे अधिकार किती आहेत. आणि ते त्यांचे अधिकार कसे वापरतात, याचाही आम्ही विचार करणार आहोत. ही लढाई रस्त्यावरचीही असेल आणि कोर्टातही असेल, असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे. (BJP-Thackeray Politics)

विरोधी पक्षनेते म्हणून बोलावे लागते म्हणून ते काहीही बोलत आहेत, पण २०० पेक्षा जास्त बहुमत असलेले सरकार आमच्याकडे आहे. एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत. तेच मुख्यमंत्री राहतील आणि विरोधकांनी कितीही स्वप्ने पाहिली तरी ती खरी होणार नाही. असंही बावनकुळेंनी स्पष्ट केलं.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT