NCB arrest 2 womens
NCB arrest 2 womens Sarkarnama
मुंबई

जीवाची मुंबई करायला आल्या; पण NCB च्या जाळ्यात अडकल्या त्या' दोघी

सरकारनामा ब्युरो

मुंबई : एनसीबीने मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रुझवर ( CRUISE ) छापा टाकत हायप्रोफाईल ड्रग्स पार्टीचा (High-profile drugs party) पर्दाफाश केला. या कारवाईत एकूण १० जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच्यासह दोन तरुणींचाही समावेश आहे. एका परदेशी कंपनी आणि एका मनोरंजन वाहिनीने संयुक्तपणे आयोजित केलेल्या या पार्टीला देशातील श्रीमंत घरातील आणि सेलिब्रिटींच्या घरातील तरुण मुलांचाही समावेश होता.

यात बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मुलासह आणि दिल्लीतील व्यापाऱ्यांचा मुलांचाही समावेश आहे. या कारवाईत दोन तरुणींनाही एनसीबीने ताब्यात घेतलं असून त्यातील मुनमुन धामेच्या या तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुनमुन धामेचा आणि नुपूर सारिका या दोघीही तरुणी दिल्लीतील मोठ्या व्यापाऱ्यांच्या मुली आहेत. या दोघीही दिल्लीहून फक्त पार्टीसाठीच मुंबईत आल्या होत्या. सध्या एनसीबी या दोघींचीही चौकशी करत आहे.

NCB सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानसह, मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्चंटला न्यायालायाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, एनसीबीने केलेल्या चौकशीत आर्यन खानने, आपल्याला या क्रुझवर गेस्ट म्हणून बोलावण्यात आलं होतं आणि त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचं मानधन घेतलं गेलं नाही. केवळ आपल्या नावाचा वापर करुन इतरांना बोलावण्यात आलं असल्याचं स्पष्टीकरण दिलं.

एनसीबीनं दिलेल्या माहितीनुसार, एनसीबीने केलेल्या या कारवाईत यात मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रांत चोकर, गोमित चोप्रा, आर्यन खान, अरबाज मर्चंट आदींना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे. या कारवाईत एनसीबीने 20 ग्रॅम कोकेन, 30 ग्रॅम चरस, 10 ग्रॅम एमडी, आणि 20 ग्रॅम टॅबलेट्स जप्त करण्यात आलं आहे. या आठ जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. एनसीबीचे समीर वानखेडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT