Jitendra Awhad News
Jitendra Awhad News Sarkarnama
मुंबई

आव्हाडांवर गुन्हा दाखल; जयंत पाटील म्हणतात 'ती' घटना मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यासमोर घडली

सरकारनामा ब्यूरो

ठाणे : भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आव्हाड यांच्या सोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी पाटील यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरुन शिंदे-फडणवीस सरकारला फटकारले.

आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांची समजूत घालण्यासाठी सांगलीहून आलो. मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ जाण्याचा प्रयत्न त्या महिलेने केला होता. आव्हाड गर्दीतून वाट काढत होते. गर्दीत न जाता तुम्ही दुसरीकडे जा, असे आव्हाड यांनी महिलेला सांगितले. हा सगळा प्रकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या समोर घडला. तिथे पोलिसही उपस्थित होते, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

त्या मुळे आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला, हे दुर्दैवी आहे. आव्हाड यांच्यावर लावलेली कलमे चुकीची असल्याचेही पाटील यावेळी म्हणाले. ठाण्याच्या पोलिसांनी ३५४ मध्ये हे प्रकरण कसे बसवले? असा सवाल करत पाटील यांनी पत्रकार परिषदेत विनयभंगाची व्याख्या वाचून दाखवली. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बघावी. राज्याचे उपमुख्यमंत्र्यांकडे गृहखाते आहे. त्यामुळे त्यांनी याची दखल घ्यावी, असे जयंत पाटील म्हणाले. पोलिसांनाही याची उत्तर द्यावी लागतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

त्या महिलेला बहीण म्हणून आव्हाड यांनी संबोधले होते. त्यांना गर्दीत बाजूला केले, तो विनयभंग होतो का? असा सवाल पाटील यांनी केला. ठाण्यातील कळवा पुलाचे उद्घाटन रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. उद्घाटन सोहळ्याला जितेंद्र आव्हाड यांच्यासह, खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर हा प्रकार घडला आहे. या कार्यक्रमात आव्हाड आणि मुख्यमंत्री शिंदे यांची चांगलीच जुगलबंदी रंगली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT