Shivsena MLA Disqualification : Sarkarnama
मुंबई

Shivsena MLA Disqualification : 'या' दिवशी होणार शिवसेना अपात्र आमदार प्रकरणाची पुढची सुनावणी ?

Maharashtra Political Crisis : राहुल नार्वेकरांनी काल दिल्लीत जाऊन वरिष्ठ कायदे तज्ज्ञांशीही चर्चा केली.

अनुराधा धावडे

Mumbai Political News : शिवसेनेतील अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी येत्या सोमवारी म्हणजेच २५ सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी हालचाली सुरू केल्या. दिल्लीत जाऊन वरिष्ठ कायदे तज्ज्ञांशीही चर्चा केली. त्यानंतर त्यांनी सोमवारी आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

  (राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी आमदार अपात्रतेवर आठ दिवसांत कारवाई करून अहवाल सादर करा, अशा शब्दांत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुनावले आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. यामुळे शिवसेनेतील शिंदे गटातील आमदारांसह ठाकरे गटाच्या आमदारांची धाकधूक वाढली आहे.

राहुल नार्वेकर काय भूमिका घेणाऱ्या याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत नार्वेकर यांनी विधान भावनातील विधी विभाग तसेच तज्ज्ञ वकिलांशीही सल्लामसलत केली आहे. त्यानंतर गुरुवारी अचानक नार्वेकर हे दिल्लीला रवाना झाले होते. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात ते पक्षश्रेष्ठी व खटल्याबाबत चर्चा केली असण्याची शक्यता आहे.

सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत विधानसभा अध्यक्षांच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. सुनावणी सुरू केली असली तरी वेळ घेतला जात असल्याने नाराजी व्यक्त करीत आठ दिवसांत कारवाईचे निर्देश दिले आहेत. सॉलिस्टर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात त्यांची बाजू मांडली असली तरी आता नवीन आदेशानुसार न्यायालयासमोर कसा अहवाल मांडता या व चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.

विधानसभा अध्यक्षाने शिवसेना कोणाची या मुद्द्यावर सुनावण्याची दिशा ठरवली आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या काळात पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना बाजू मांडण्यासाठी नोटीस पाठवण्यात येणार असल्याचे समजते. त्यासोबतच नार्वेकर हे येत्या काळात याबाबत घटनात्मक पेच निर्माण होऊ नये, यासाठी दिल्लीतील ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ यांच्याशी चर्चा करीत असल्याचे समजते.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT