Chitra Wagh
Chitra Wagh Sarkarnama
मुंबई

आम्हीच मुंबईचे दादा म्हणणाऱ्यांचा माज मुंबईकर जनताच उतरवेल : चित्रा वाघ

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुंबईचा दादा आम्हीच असे सांगणाऱ्यांची दादागिरी आणि माज आता मुंबईकर जनताच उतरवेल, अशी टीका भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांच्या घरात घुसण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर वाघ बोलत होत्या.

आम्ही घरात घुसलो तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना नागपूरलाही जाता येणार नाही, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यावरून भाजपाच्या नेत्यांनी खासदार राऊत यांच्यावर चौफेर हल्ला चढवला आहे.भाजपाचे आमदार अमित साटम यांनी खासदार राऊत यांना थेट इशारा दिला आहे. मुंबई तुमची जहागिरी नाही, असे म्हणत घरात घुसायची भाषा करणाऱ्या राऊत यांना त्यांच्या घरात किती किंमत आहे हे आम्हाला चांगलं माहित आहे, असे आमदार साटम यांनी म्हटलं आहे.

आमदार साटम यांच्या पाठोपाठ चित्रा वाघ यांनीदेखील खासदार राऊत यांच्यावर तिखट शब्दात टीका केली आहे. त्या म्हणाल्या, ‘‘ सर्वज्ञानी असलेल्या संजय राऊत यांनी मुंबईचा सातबारा स्वत:च्या नावावर केलाय का ? मुळात मुंबईचे दादा असल्याचे बोलून दाखवावं लागतयं यातच सर्वकाही लक्षात येत आहे.राऊत यांच्या अशा बेताल बोलण्यानं मुबंईकरांचे चांगलेच मनोरंजन होत आहे.’’

खासदार राऊत यांच्या निकटवर्तीयांना ‘ईडी’ गेल्या काही दिवसांपूर्वी अटक केल्याने ते बेताल बोलत असल्याची टीका भाजपाकडून करण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. खासदार राऊत यांच्या नेहमीच्या वक्तव्याने लोकांचे मनोरंजन होत असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT