Mukesh Ambani|
Mukesh Ambani| 
मुंबई

Mukesh Ambani| अंबानी कुटुंबाला धमकी देणाऱ्याला अटक

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी लिस्टेड कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी कुटुंबाला चार-पाच तासांत संपवण्याची धमकी देण्यात आली होती. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या फोनवर ही धमकी आली होती. या धमकीनंतर पोलीस यंत्रणांनी तपासाची चक्रे फिरवत मुंबईतून एकाला अटक केली आहे. त्यासाोबतच पोलिसांनी या धमकी प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. (Death threat to Mukesh Ambani family)

या प्रकरणी पोलिसांनी बोरिवलीतील एमएचबी कॉलनी परिसरातून विष्णू भुमिक नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे वय अंदाजे 55 ते 57 वर्षे असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक तपासात तो मानसिक रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे. विष्णु भुमिक स्वत: दहिसर येथील रहिवासी असल्याचे सांगत आहे. तो संभाषणात होकार देत असल्याचे दिसते. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.

रिलायन्स फाऊंडेशनच्या हरकिशनदास हॉस्पिटलच्या डिस्प्ले क्रमांकावर हे फोन कॉल्स करण्यात आले होते. यामध्ये मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देण्यात आली होती. एवढेच नाही तर धमकीचे फोन एक-दोनदा नव्हे तर तब्बल आठ वेळा करण्यात आले. तक्रार मिळताच याप्रकरणी डीबी मार्ग पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत भुमिक याला ताब्यात घेतले.

या तक्रारीनंतर अंबानींच्या कुटुंबीयांची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. त्याचबरोबर पोलीस या कॉल्सची पडताळणी करत आहेत. कॉलर एकच असून त्याने सलग तीन कॉल केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणाची माहिती मुंबई पोलीस आयुक्तांना देण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली आहेत.

मुकेश अंबानी यांना Z+ सुरक्षा

मुकेश अंबानी यांना हिजबुल मुजाहिद्दीनकडून धमक्या मिळाल्यानंतर 2013 मध्ये तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने झेड प्लस सुरक्षा प्रदान केली होती. त्यांची पत्नी नीता अंबानी यांना 2016 मध्ये केंद्र सरकारने वाय प्लस सुरक्षा प्रदान केली होती. त्यांच्या मुलांनाही महाराष्ट्र सरकारकडून दर्जेदार सुरक्षा दिली जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT