Uddhav Thackeray Morcha :  Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray Morcha : पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली; ठाकरे गट काय करणार?

Uddhav Thackeray Morcha On Bmc : कायदा सुव्यस्थेच्या प्रश्नामुळे मोर्चा काढता येणार नाही!

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena Thackeray Group) पक्षाकडून मुंबई महानगरपालिका इमारतीवर (BMC) मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १ जुलै रोजी या महामोर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चासाठी ठाकरे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. मात्र आता या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. यामुळे आता परवानगी नाकारली असताना आपला नियोजित मोर्चा ठाकरे गट काढणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Latest Marathi News)

महापालिकांवर प्रशासक राज आल्यापासून मुंबई महापालिकेच्या रस्ते कामात तसेच खडी आणि वेंडिग मशीनच्या घोटाळ्यासह अनेक घोटाळे झाल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. यामुळेच ठाकरे गटाने मोर्चाची हाक दिली आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने एक टीझर शेअर केला आहे, महापालिकेवर प्रशासक राज आल्यापासून मुंबई पालिकेत भ्रष्टाचार कसा झाला आणि किती रक्कमेचा झाला, याबद्दल माहिती दिली होती.

परवानगी नाकारल्यानंतर ठाकरे गटाची भूमिका काय?

1 जुलै रोजी ठाकरे गटाचा महामार्चाला पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण पुढे करत परवानगी नाकारली आहे. यामुळे या मोर्चात प्रशासनाने खोडा घातला, अशी भावना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. मात्र आता परवानगी नाकारल्यानंतरही ठाकरे गट आपल्या भूमिकेवर ठाम राहणार का? परवानगी नसताना ठाकरे गटाचा नियोजित केलेला मोर्चा काढणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, यावर ठाकरे गटाकडून अजून प्रतिक्रिया आली नसली तरी, ठाकरे गटाचं पुढचं पाऊल काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

ठाकरे गटाकडून मोर्चाचे नियोजन -

24 जून रोजी शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई येथे पक्ष पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी मेळावा पार पडला होता. 1 जुलैच्या मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणार आहे. त्या अनुषंगाने तयारी आणि मार्गदर्शनासाठी मेळाव्याचे नियोजन होते. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मेळाव्याला संबोधित केले होते. यामुळे ठाकरे गट १ जुलै रोजी परवानगी नसताना ठाकरे गट मोर्चावर ठाम राहणार का? याकडे लक्ष्य केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT