Rohit Pawar Tweet : Sarkarnama
मुंबई

Rohit Pawar Tweet : 'सामान्य माणसासोबतची नाळ, साहेबांचं स्थान अढळ'; रोहित पवारांची पोस्ट चर्चेत !

Rohit Pawar Tweet : "हीच साहेबांची ताकद आहे.."

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : राज्याच्या राजकारणात सर्वात मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट निर्माण झाले आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट भाजपसोबत सामील झाला आहे. काल (ता. 6) राष्ट्रवादी काँग्रसच्या दोन्ही गटांची शक्तिप्रदर्शन झाले. या सर्व घडामोडींवर आता रोहित पवार यांचा सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे

रोहित पवार यांनी इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत आहे. रोहित पवार यांना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक जुना व्हिडीओ पोस्ट केला आहे. शरद पवार हे बारामतीतून निघत असताना त्यांनी वाहन थांबवून एका वृद्ध व्यक्तिशी भेट घेतलेला हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत रोहित पवार म्हणाले , "सामान्य माणसासोबतची ही नाळ महत्त्वाची असते. साहेबांच्या बाबतीत ती अधिक घट्ट असल्याने साहेबांचं स्थान अढळ आहे आणि राहील. हीच साहेबांची ताकद आहे."

अजित पवारांनी पक्षात बंड केलेलं असताना, त्यांच्यासोबत बहुतांशी राष्ट्रवादीच्या नेत्यांचा, आमदारांचा पाठिंबा आहे. मात्र असे असले तरी राष्ट्रवादीचे युवा आमदार व पवार कुटुंबियातील नवोदित नेते रोहित पवार हे मात्र शरद पवारांच्या पाठीशी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT