Vinayak Mete Sarkarnama
मुंबई

Vinayak Mete : मेटे अपघातप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सीआयडीची मोठी कारवाई

Vinayak Mete : विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी अपघाताच्या त्या दोन तासात काय झालं? याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली होती.

सरकारनामा ब्युरो

Vinayak Mete : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दोन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकाना दिले होते. मेटे यांच्या अपघात प्रकरणी सीआयडीने चौकशी केली आहे. (vinayak mete accident Latest news)

मेटे यांच्या गाडीचा चालक एकनाथ कदम यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'विविध सीसीटीव्हीचे फुटेज पाहण्यात आले आहेत,' त्यावरुन सीआयडीने ही कारवाई केली आहे. एकनाथ कदम याला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे समजते.

राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना या मृत्यूची सीआयडी चौकशी करून आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले होते

शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटेंच्या गाडीला 14 ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास अपघात झाला. मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर ही घटना घडली होती.

विनायक मेटे हे मराठा आरक्षणाच्या बैठकीला येण्यासाठी निघाले होते. त्याचवेळी त्यांचं अपघाती निधन झालं. एकनाथ शिंदे यांनी विनायक मेटेंच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती निधनानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले त्यानंतर विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी अपघाताच्या त्या दोन तासात काय झालं? याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली होती

विनायक मेटे यांच्या गाडीला 14 ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान विनायक मेटे यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी मेटेंच्या वाहन चालकावर संशय घेत त्याची चौकशी करण्याची मागणी केली होती. विनायक मेटे यांचा चालक वेगवेगळा जबाब देतोय, असा आरोप मेटेंच्या भाच्याने केला आहे. मेटेंच्या चालकाने लोकेशन विचारलं त्याने उत्तर दिलं नाही, असा देखील आरोप केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT