Devendra Fadanavis  
मुंबई

हिवाळी अधिवेशनाबाबत राज्य सरकारची बोटचेपी भूमिका'

देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारवर टीका

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यातील घडामोडी पाहता राज्य सरकारने (Mahavikas Aghadi) केवळ चार चे पाच दिवसांचे विधीमंडळाचे अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर च्या 22,23,24 आणि 27, 28 या पाच दिवशी अधिवेशन होणार आहे. मात्र या अधिवेशनाच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्यसरकारवर निशाणा साधला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी ते बोलत होते. '' राज्य सरकारने केवळ चार-पाच दिवसांचे अधिवेशन बोलवले आहेत. यातला एक दिवस शोकसभेत निघून जातो. म्हणजेच हे यंदाचे हिवाळी अधिवेशन हे केवळ चार दिवसांचे होणार आहे. यावरुन राज्य सरकारची अधिवेशनाबाबत बोटचेपी भूमिका दिसून येत असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे.

"गेल्या दोन वर्षांत अनेक अतारांकित प्रश्न आहेत. अतारांकित प्रश्नांना उत्तरे द्यायला सरकारकडे वेळ नाही. अतारांकित प्रश्नाला उत्तर देण्यासाठी अधिवेशन लागत नाही. दोन वर्षांत बीएसीत हा अतारांकित प्रश्नांचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र कोणत्याही अतारांकित प्रश्नांना, लक्षवेधी प्रश्नांना उत्तरे देण्यात आली नाहीत, यावर मी प्रचंड नाराजी व्यक्त केली. यावर प्रलंबित अतारांकित प्रश्नांची उत्तरे अधिवेशनाच्या आधी देऊ, असं राज्य सरकारने आश्वासित केलं असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

त्याचबरोबर, यंदाच्या अधिवेशनात किमान लक्षवेधी तरी लावण्याची विनंती केली. यावरही राज्यसरकारने दररोज लक्षवेधी आणि प्रश्नोत्तरे घेण्याचं आश्वासन राज्यसरकारने दिलं आहे. पण एकूणच पाहता राज्यसरकारची अधिवेशनासंबंधीची राज्यसरकारची भूमिका बोटचेपी असल्याचे दिसत आहे. राज्य सरकारला कोणत्याही प्रश्नांची उत्तरे द्यायची नाहीत. अशी टीकाही फडणवीसांनी केली.

यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूरातच व्हावे अशी आम्ही आग्रही मागणी केली होती. पण राज्यसरकार कोणत्या ना कोणत्या कारणावरुन नागपूरात हिवाळी अधिवेशन घेण्याचं जाणीवपूर्वक टाळत आहे. विदर्भातील लोकांना त्यांची फसवणूक झाल्याचं वाटत आहे. मुख्यमंत्र्याना नागपुरात अधिवेशन घेता येत नसेल तर मार्चचे अधिवेशन नागपुरात घेण्याबाबत विचारणा केली. यावर बैठक घेऊन पुढील निर्णय घेऊ,असंही सरकारने म्हटलं आहे. त्यामुळे संसदीय कामकाजात सरकारला रस नाही. जनतेमध्ये याचा रोष आहे. असही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

डिसेंबर महिन्याच्या 22,23,24 आणि 27, 28 या पाच दिवशी अधिवेशन होणार आहे. पण हे अधिवेशन अजून काही दिवस वाढवू शकतो का, यावर 23 डिसेंबरला अधिवेशन दरम्यान बैठक होणार असल्याचंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT