Maharashtra Budget Session : राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडा आजपासून सुरु होत आहे. होळी आणि धुळवडीमुळे दोन दिवस अधिवेशनाचे कामकाज बंद होते. पण आज विविध मुद्यावरुन अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. गेल्या चार-पाच दिवसांत राज्यातील विविध भागात अवकाळी पावसामुळे (rain) शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच शेतमालाला हमी भाव यासह इतर मुद्यांवरुन विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येऊ शकतात.
मागच्या तीन-चार दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसानं शेतीचं मोठ नुकसान झालं आहे. त्यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी, यासाठी मागणीसाठीविरोधी पक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे. याशिवाय कांदा, कोथिंबीर, मेथी, कापूस, सोयाबीन या शेतमालालाही भाव मिळत नाहीये. बाजारात शेतकऱ्यांच्या कांदा कमी दरानं खरेदी केला जात आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करावा, अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे.
दरम्यान, आज सभागृहात राज्याचे आर्थिक धोरण जाहीर केलं जाणार आहे. त्यामुळं राज्याची आर्थिक परिस्थिती यावरुन स्पष्ट होणार आहे. तर उद्या (9 मार्च) राज्याच्या अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करणार आहे,
याशिवाय, आगामी महापलिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध घोषणांही केल्या जाऊ शकतात. तसेच, मुंबई, ठाणे, नागपूर या शहरांसाठी अर्थसंकल्पांत महत्त्वाच्या तरतुदी होऊ शकतात असही बोललं जात आहे. तर कृषी, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, सिंचन, ऊर्जा आदी विभागांना अर्थसंकल्पात काय मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.