Eknath Shinde-Uddhav Thackeray
Eknath Shinde-Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाने ठाकरेंची डोकेदुखी वाढली; आता तीन शक्यता कोणत्या?

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : धनुष्यबाण पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कारवाईला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नकार दिला आहे. त्यामुळे धनुष्यबाण हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार, याचा निर्णय घेण्यास निवडणूक आयोग मोकळे झाले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासाठी दिलासा देणारा असल्याचे सांगण्यात येत आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची धाकधूक वाढवणारा, असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. ठाकरेंसमोर धनुष्यबाण हे पक्षचिन्ह टिकवण्याची कसोटी असणार आहे.

शिंदे गटाच्या अर्जावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने आज सकाळी १०. ३० पासून संपूर्ण दिवस सुनावणी घेतली. यावेळी शिवसेना आणि शिंदे गटाच्या वतीने जोरदार युक्तीवाद झाला. त्यानंतर शिवसेना पक्ष खरा कोणाचा, या प्रश्नावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरु असलेल्या कार्यवाहीला स्थगिती नसेल, असा निर्णय न्यायालयाने दिला.

केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या कार्यवाहीला स्थगिती द्यावी, अशी विनंती ठाकरे यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, तो अर्ज न्यायालयाने फेटाळला. केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील कार्यवाहीला स्थगिती नसेल, असे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तींच्या पूर्णपीठाने स्पष्ट केले.

आता निवडणूक आयोगात काय होणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. त्यामध्ये निवडणूक आयोग धनुष्यबाण हे पक्षचिन्ह उद्धव ठाकरे गटाला देऊ शकतो. किंवा आयोग धनुष्यबाण चिन्ह ठाकरे किंवा शिंदे यापैकी एका गटाला देण्याचा निर्णय घेऊ शकते. किंवा पक्षचिन्ह गोठवण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो. पक्षचिन्ह गोठवण्याचा निर्णय झाला तर दोन्ही गटांना नवीन चिन्हे दिले जाईल. हा निर्णय उद्धव ठाकरेंना मोठा हादरा देऊ शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT