Maharashtra Poltical Crisis Sarkarnama
मुंबई

Maharashtra Poltical Crisis: सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया; अनिल परब म्हणाले...

Supreme Court Final Decision : 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा निर्णय राज्याच्या विधानसभा अध्यक्षांकडे

सरकारनामा ब्यूरो

SC Final Decision On ShivSena: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

गेल्या 11 महिन्यांपासून देशाचे लक्ष लागून असलेला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल आज सुप्रिम कोर्टाने जाहीर केला . आता 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा निर्णय राज्याचे विधानसभा अध्यक्ष घेणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली. अनिल परब म्हणाले, "राहुल शेवाळे काय म्हणतात आम्ही त्यांना जास्त महत्व देत नाही. न्यायालय काय म्हणालं त्याला आम्ही जास्त महत्व देतो. त्यांना दिलासा आहे, पण फक्त 15 दिवसांचा.

न्यायालयाने सांगतिलं की उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे आम्ही टेटस्को देऊ शकत नाही. म्हणजे याचा अर्थ व्यवस्थित समजून घेतला तर त्यांची अॅक्टिविटी अवैध झालेली आहे. हे जवळपास कोर्टोने मान्य केलं", असं ते म्हणाले.

"उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही टेटस्को दिला असता. असंही न्यायालयाने म्हटलं आहे. आता आम्ही न्यायालयाच्या निर्णयाची प्रत घेऊन विधानसभा अध्यक्षांकडे जाऊ. त्यांना लवकर निर्णय घेण्याची विनंती करणार आहोत. त्यामुळे त्यांनी जाण्याची तयारी करावी. तसेच कोर्टाच्या निर्णयाचा आदर राखून आणि नैतिकता असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा", असं अनिल परब म्हणाले.

(Edited By - Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT