Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule 
मुंबई

...तर १५ ऑक्टोबरला प्रादेशिक कार्यालयासमोर आंदोलन : चंद्रशेखर बावनकुळे

अतुल मेहेरे

नागपूर : महावितरणमध्ये पाच हजार विद्युत सहायक, दोन हजार उपकेंद्र सहायक व ४०० शाखा अभियंता अभियंत्यांच्या नियुक्तीचे आदेश येत्या १४ ऑक्टोबरपर्यंत महावितरण प्रशासनाने काढावे. अन्यथा १५ ऑक्टोबरला नागपूर प्रादेशिक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपचे प्रदेश महासचिव व माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

श्री बावनकुळे म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासन काळात आयटीआय अर्हताधारक व आयटीआय अप्रेंटिशिपधारक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या उद्देशाने महावितरण कंपनीअंतर्गत अनुक्रमे ५ हजार विद्युत सहायक, २ हजार उपकेंद्र सहायक तसेच ४०० शाखा अभियंता यांच्या नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार अर्ज करणे, आवश्यक त्या पदाची परीक्षा घेणे या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. फक्त संबंधित अर्जदारांची कागदपत्रे पडताळणी करून नियुक्ती करणेच तेवढे शिल्लक आहे. असे असताना या अर्जदारांना अजूनपर्यंत महावितरणने नियुक्ती दिलेली नाही.

विद्युत सहायक, उपकेंद्र सहायक तसेच शाखा अभियंता यांच्या नियुक्तीचे आदेश १४ ऑक्टोबरपर्यंत काढण्यात आले नाही तर १५ ऑक्टोबर रोजी महावितरणच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असे बावनकुळे यांनी महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांना पाठविण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT