Krupal Tumane 
मुंबई

...तर बिहारचाही महाराष्ट्र करून दाखवू : खासदार तुमाने

भाजप आणि जनता दलाने बिहारची जी बदनामी केली, त्यासाठी तेथील जनता या दोन्ही पक्षांना धडा शिकवेल. बिहारमध्ये जर महाराष्ट्राप्रमाणे शांतता नांदवायची असेल, तर शिवसेनेला लोकांनी भरघोस मते द्यावी, असेच आपण तेथील जनतेला सांगणार आहोत.

अतुल मेहेरे

नागपूर : बिहारचे लाखो लोक आज महाराष्ट्रात शांततेने राहात आहेत. येथे राहणारे ‘हमे तो बिहार से ज्यादा यहां अच्छा लगता है’, असे सांगतात. बिहारमध्ये कायदे नाहीत. सकाळी शौचाला जातानाही लोक बंदूक सोबत घेऊन जातात, अशी परिस्थिती आहे. बिहारच्या जनतेने या निवडणुकीत शिवसेनेला भरघोस मते दिल्यास बिहारचाही महाराष्ट्र करून दाखवू, असे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने आज ‘सरकारनामा’शी बोलताना म्हणाले. 

शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बिहारमध्ये स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. बिहार निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांनी युवासेना प्रमुख व महाराष्ट्राचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह कृपाल तुमाने, सुभाष देसाई, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत, गुलाबराव पाटील, राजकुमार बाफना, प्रियांका चतुर्वेदी, राहुल शेवाळे, सुनील चिटणीस, योगराज शर्मा, कौशलेंद्र शर्मा, विनय शुक्ला, गुलाबचंद दुबे, अखिलेश तिवारी, अशोक तिवारी यांची प्रचारक म्हणून निवड केली आहे. ही निवड झाल्यानंतर खासदार तुमानेंनी ‘सरकारनामा’शी बोलताना उपरोक्त प्रतिक्रिया दिली. 

खासदार तुमाने म्हणाले, सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात भारतीय जनता पक्ष आणि जनता दलाने बिहारची देशभर बदनामी केली. संपूर्ण देशात बिहारची नाचक्की झाली आहे. शेवटी काय झाले?  मुंबई पोलिसांनी जो तपास केला, तोच खरा निघाला. मुंबई पोलिसांची बदनामी करताना विरोधक हे विसरले की, संपूर्ण जगात स्कॉटलॅंड यार्ड पोलिसांनंतर मुंबई पोलिसांचा नंबर लागतो. भाजप आणि जनता दलाने बिहारची जी बदनामी केली, त्यासाठी तेथील जनता या दोन्ही पक्षांना धडा शिकवेल. बिहारमध्ये जर महाराष्ट्राप्रमाणे शांतता नांदवायची असेल, तर शिवसेनेला लोकांनी भरघोस मते द्यावी, असेच आपण तेथील जनतेला सांगणार आहोत.

पहिला दौरा १९ ते २३ ऑक्टोबर
बिहार निवडणुकीच्या प्रचारासाठी नियोजन केलेले आहे. पहिला दौरा १९ ते २३ ऑक्टोबरदरम्यान करणार आहे. यामध्ये तेथील स्थानिक उमेदवारांना भेटून तेथील समस्या आणि प्रचाराचे मुद्दे यावर चर्चा करून प्रचाराची रणनीती ठरविण्यात येणार आहे, असे खासदार तुमाने म्हणाले. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT