मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली असून परिणामी शिंदे गटाची शिवसेना आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना, अशा दोन शिवसेना अंधेरी पोट निवडणुकीच्या निमित्ताने तात्पुरत्या स्वरूपात तयार झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूने एकमेकांवर टीका होत आहे.
दरम्यान, शिंदे गटाला मिळालेल्या बाळासाहेबांची शिवसेना (Shivsena) या नावावरून मात्र शिंदे गटाला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात असून शिवसेना नेत्यांकडूनही त्यांच्या नावावरून तुमची सेना ही बाळासाहेब विखेंची की थोरातांची, अशी खिल्ली उडवली जात आहे. आता यावर खुद्द कॅाग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आपली गंमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे. (Balasaheb Thorat, Eknath Shinde , Devendra Fadnavis Latest News)
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रे संदर्भात काँग्रेस नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि अतुल लोंढे यांनी आज राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची भेट घेतली आणि गांधी यांची 3 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात सुरू होत असलेली यात्रेला कुठलही गालबोट लागू नये, यासाठी त्यांनी महासंचालकांना सांगितले. यानंतर थोरात आणि पटोलेंनी माध्यमांशी संवाद आहे.
यावेळी पटोले पालघर साधू सीबीआय चौकशी संदर्भात बोलतांना म्हणाले, अनेक चौकश्या होत आहेत. त्यात त्यांच पितळ उघड पडणार होत. मात्र महाराष्ट्रातील पोलिसांना कमी दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अंधेरी पोट निवडणुकीत विरोधकांच्या पाया खालची वाळू आता सरकली आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून ती जागा 40 ते 50 हजार मतांनी निवडून आणणार आहे. भाजपने शिवसेनेमध्ये आग लावली आहे. त्यावर आम्ही काही बोलणार नाही. केंद्रीय तपास यंत्रणा किंवा त्यांचं काय चाललंय हे सर्वांना माहीत आहे केंद्र सरकारचा मोठा दबाव आहे. मात्र, लोकांना आता कळायला लागला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
दरम्यान, बाळासाहेब थोरातांनी यावेळी प्रतिक्रिया दिली असून, शिंदे गटाला मिळालेल्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या नावावरून आणि त्यावरून सोशल मीडियावर केले जात असलेल्या ट्रोलींग बघता बाळासाहेब म्हणाले की, माझा फोटो लावला तर शिंदे गटाकडून मला रॉयल्टी घ्यावी लागेल, अशी गंमतीशीर प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. याचबरोबर आम्ही महाविकास आघाडी म्हणून अंधेरी पोट निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.