मुंबई : ''उठ..सूठ जो तो आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सल्ला देत आहे. पण बंडखोरांना सल्ला देण्याचा अधिकार कोणी दिला. अडचणीच्या काळात सर्वजण आपले स्वार्थ साधत आहेत, त्यांनीच आता पक्षप्रमुख यांचा छळ सुरु केला आहे," अशा शब्दांत शिवेसनेचे खासदार अरविंद सावंत यांनी उत्तर दिले आहे. रामदास कदम यांनी प्रसारमाध्यमांवर दिलेल्या मुलाखतीनतंर अरविंद सावंत यांनी कदम यांच्यावर निशाणा साधला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ज्येष्ठ नेते रामदास कदम यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पण त्याआधीच त्यांनी नेतेपदाचा राजीनामा दिला होता. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षाची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करत कदम यांना पुन्हा नेतेपद दिलं. पण हकालपट्टीमुळे कदम चांगलेच निराश झाले आहेत. शिवसेनेसाठी आम्ही 52 वर्ष सर्वकाही केलं, असं सांगताना कदम यांना अश्रू अनावर झाले. यानंतर अरविंद सावंत यांनी कदम यांचा चांगलाच समाचार घेतला.
रामदास कदम कोकणातल्या खेडमध्ये पराभूत झाले होते. तेव्हाही ते ब्लॅकमेल करत होते. त्यांनी राष्ट्रवादीशी संधान बांधलं होतं. आमचं पुनर्वसन करा, अशी वारंवार मागणी करत होते. पण रामदास कदम पक्षातून बाहेर पडू नये म्हणून त्यांचं पुनर्वसन केलं. राजकीय पुनर्वसन व्हावे म्हणून यांना विधानपरिषदेवर पाठविले. मुंबई महापालिकेतून विधान परिषदेवर जो प्रतिनिधी जातो तिथे त्यांच्या मुलाला संधी देण्यात आली. हे कोणी केलं उद्धव ठाकरें यांनीच केलं ना. हे उपकार नाहीत का, तुमच्यावर आणि काय म्हणून तुमचचं पुनर्वसन करायंच, का इतरांना संधी नाही द्यायची, पण नाही, फक्त मला आणि मलाच मिळालं पाहिजे. आम्ही तुमच्याच मुलाला संधी दिली ना, मग का नाही तुम्हाला एखादा शिवसैनिक उभा करता आला, पण तुमचा मुलगा पाहिजे. जेव्हा तुम्ही असा स्वार्थ साधत असता तेव्हा कुठे जातो तुमचा परमार्थ? असा सवाल सावंत यांनी कदमांना केला.
शिवसेना सोडताना दु:खं होत असल्याचं रामदास कदम म्हणाले, असं विचारलं असता अरविंद सावंत म्हणाले, तुम्हाला दु:ख होतंय, त्रास होतो. मग अडीच वर्षे कुठे गेले होते, तुम्ही कमी त्रास दिला का उद्धवजींना. पक्षाच्या धोरणांच्या विरोधात सातत्याने बोलणारे तुम्ही, तुम्ही काय सांगता, शिवसैनिक म्हणून काय केलं पाहिजे ते, आता आम्हाला सल्ला देण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, तुम्ही उद्धवजींना जसे छळताय, ब्लॅकमेल करताय, ते महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात येत आहे. आता स्वार्थासाठी आंधळ्या झालेल्या लोकांनी आम्हाला दृष्टी देण्याचा प्रयत्न करु नये, असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला
एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना त्यांच्यासोबत येण्याची मागणी करत आहेत. असे विचारले असता, अरविंद सावंत म्हणाले, कोणासोबत जायंच, कोण आहेत ते, हे त्यांना तरी माहित आहे का, त्यांची ओळख काय, हाका मारी ज्याच्या नावे त्याचे नावचं नाही ठावे, कोणाकडे चाललेत तुम्ही, हे सर्व घटनेच्या विरोधात चाललं आहे. हा जो गट फुटलाय त्याला मर्ज व्हावं लागेल, जाताय का मग भाजपात, का कुठल्या दुसऱ्या पक्षात जाताय ते ठरवा ना आधी, उद्धव ठाकरेंनी स्वत: चा स्वाभिमान सोडून कोणाचे पाय धरायचे. उद्धव ठाकरेंनी सातत्याने आव्हान केलं, दूरध्वनीवरुन बोलले, मोबाईलवर बोलले, सामनाममध्ये बातमी दिली, तुम्ही या आपण बोलू आणि निर्णय घेऊ म्हणाले, मग आलात का तुम्ही, जर तुम्हाला एवढा अधिकार वाटतो तर त्यांचे कान ओढायचे होते, त्यांचे कान ओढून उद्धवजींसमोर आणायचं होते त्यांना, पण तुम्ही तसं न करता उद्धवजींनाच त्यांच्यासमोर झुकायला लावलं. असशी खंतही अरविंद सावंत यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.