Devendra Fadanvis
Devendra Fadanvis  Sarkarnama
मुंबई

125 तासांच्या रेकॉर्डिंगशिवाय आणखी पुरावे; फडणवीसांचा गौप्यस्फोट

सरकारनामा ब्युरो

मुंबई : 'सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Pravin Chavan)यांचे आणखी काही व्हिडीओ माझ्याजवळ आहेत. ही केस सीबीआय कडे गेल्यानंतर मी सीबीआय ला याबाबतचे सर्व पुरावे देणार आहे,'' असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी (८ मार्च) विधानसभेतच एक स्टिंग ऑपरेशन सादर केलं. यामध्ये त्यांनी सरकारी वकिल प्रवीण चव्हाण (Pravin Chavan)यांचं संपूर्ण स्टिंग ऑपरेशन केलं आहे. राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकील मिळून विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र आखत असल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

त्यानंतर आज पुन्हा त्यांनी पत्रकार परिषदेत प्रविण चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. "प्रवीण चव्हाण हे वकील आहेत तसा मी ही वकील आहे. प्रविण चव्हाण यांच्या व्हिडीओ बाबत मी फॉरेन्सिक रिपोर्ट ही मिळवला आहे.याबाबात मी सीबीआय चौकशीची मागणी करणार आहे. जर सरकराने हे प्रकरण सीबीआयला दिले नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ. प्रविण चव्हाण यांच्यावर आरोप केल्यानंतर तीन दिवस चव्हाण का बोलले नाही. याचाच अर्थ चव्हाण हे राज्य सरकारशी बोलून उत्तर देत आहेत, असेही फडणवीसांनी सांगितले.

मार्च २०२१ मध्ये भाजपच्या कार्यालयात एक पत्रकार परिषद घेवून मी महाविकास आघाडीचा बदल्यांचा घोटाळा बाहेर काढला होता. त्याची माहिती मी भारताचे गृहसचिवांना ही माहिती सादर केली. याचं गांभीर्य ओळखून न्यायालयाने ही चौकशी सीबीआयला दिली. सीबीआय अजूनही चौकशी करत आहे. यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचीही चौकशी सुरु आहे.

या दरम्यान महाविकास आघाडीने आपला घोटाळा लपवण्यासाठी एक गुन्हा दाखल केला आहे. यानुसार ऑफिशीयल सिक्रेट्स अॅक्टमधील माहिती लिक कशी झाली? असा गुन्हा दाखल आहे. याबद्दल पोलिसांनी चौकशीसाठी मला एक प्रश्नावली पाठवली. मी त्यांना उत्तर दिले की याची माहिती मी त्यांना देईन.

मात्र विरोधी पक्ष नेते म्हणून हा माझा विशेषाधिकार आहे की, माझी माहिती कुठून आली हा प्रश्न विचारला जावू शकत नाही. मात्र मला पुन्हा प्रश्नावली पाठवण्यात आली. तसेच न्यायायलात सांगण्यात आलं की मला प्रश्नावली पाठवून देखील मी उत्तर देत नाही. यानंतर काल मुंबई पोलिसांनी सीआरपीसी १६० ची नोटिस पाठवण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT