Uddhav Thackeray, Subhash Desai, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Subhash Desai, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का बसणार; सुभाष देसाईंचे पुत्र शिंदे गटाच्या वाटेवर?

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का बसणार असल्याचे सांगितेल जात आहे. कारण ठाकरेंचे विश्वासू नेते, माजी मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे पुत्र भूषण देसाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे.

भूषण देसाई लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. देसाई ज्येष्ठ नेते आणि उद्धव ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. खासदार गजानन किर्तीकर यांच्यानंतर सुभाष देसाई यांच्या घरातही फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या चर्चेनंतर, सुभाष देसाई यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न माध्यमांनी केली. मात्र, त्यावर प्रतिक्रिया देण्यास देसाई यांनी नकार दिला. त्यामुळे या प्रकरणाची अधिक चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना एका मागून एक धक्के बसत आहेत.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्षातील 40 आमदार आणि 13 खासदार गेले आहेत. तसचे राज्यभरातील अनेक पदाधिकारीही शिंदे गटात गेले आहेत. काही दिवसांपूर्वी खासदार गजानन किर्तीकर हे शिंदे गटात गेले. त्यानंतर ठाकरे यांना हा मोठा धक्का आहे.

'मातोश्री'च्या विश्वासातील नेते अशी सुभाष देसाई यांची ओळख आहे. मात्र, त्यांच्याच मुलाचा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश होणार असल्याने याची मोठी चर्चा होती आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालायत सुनावणी सुरु आहेत. त्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे गटाला दिला आहे. त्यामुळे शिंदे गटात मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT