Jitendra Awhad Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad : ‘ही तीन वर्षे कायम लक्षात राहतील : आणखी किती ठिकाणी अडकविले जाईल, सांगता येत नाही’

ही तीन वर्ष कायमची लक्ष्यात राहतील. जखम हृदयावर आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते, आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना ‘कथित विनयभंगाचा दाखल झालेला गुन्हा’ चांगलाच जिव्हारी लागला होता. जीवनातील काही महत्वाच्या घटनांमध्ये त्याचा उल्लेख करत आणखी किती ठिकाणी अडकविण्याचा प्रयत्न केला जाईल. काही सांगता येत नाही, असे सूचक विधानही आव्हाड यांनी केले आहे. (These three years will be remembered forever : Jitendra Awhad)

जितेंद्र आव्हाड यांनी नव्या वर्षात एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी तीन वर्षांसदर्भात भाष्य केले आहे. ही तीन वर्षे आपल्या कायम लक्षात राहतील असेही त्यांनी म्हटले आहे. आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, १९९७ मध्ये आई सोडून गेली, २०१७ मध्ये बाबा सोडून गेले आणि २०२२ मध्ये पोलिसांनी राजकीय दबावापोटी खोटी विनयभंगाची तक्रार माझ्याविरोधात केली. ही तीन वर्ष कायमची लक्ष्यात राहतील. जखम हृदयावर आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

आता ह्यानंतर किती ठिकाणी अडकवण्याचा प्रयत्न केला जाईल, काही संगता येत नाही. सत्य परेशान हो सक्ता हैं। पराजित नही। असेही जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलेले आहे. तसेच माध्यमाशी बोलतानाही २०२२ वर्षे अत्यंत वाईट गेल्याचेही आव्हाड यांनी नमूद केले आहे.

विनयभंगाची तक्रार या घटनेनंतर दाखल झाली

ठाण्यातील एका कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्र आले होते. त्या कार्यक्रमानंतर परत जात असताना भाजप महिला पदाधिकारी यांना बाजूला केल्यानेत आव्हाड यांच्याविरोधात संबंधित महिलेने तक्रार दाखल केली हेाती. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल झाली होती. तत्पूर्वी हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली हेाती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT