Mumbai, 20 July : सोनम वांगचूक यांना सरकारने उचलून रुग्णालयात दाखल केले आहे. पण त्यांना खऱ्या अर्थाने सोनम वांगचूक यांना शहीद करायचं होतं आणि संपूर्ण देशात या आंदोलनाचा भडक काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना उडवायचा होता, असा खळबळजनक दावा आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
ते म्हणाले, झुरळ पार्टीचं दिल्ली आंदोलन सुरू आहे. नीट परीक्षेत जे घोटाळे झाले आहेत, त्याची सीबीआय चौकशी सुरू आहे. अनेकांना अटक करण्यात आली असून आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांचा या घोट्याळ्याशी कुठेही संबंध नाही. चौकशीत तसं कुठंही निष्पन्न झालेले नाही. गैरव्यवहार झाल्याचे पुढे आल्यानंतर शिक्षणमंत्री प्रधान आणि केंद्र सरकारने कारवाईचे आदेश दिले.
झुरळ पार्टीची पहिल्यांदा शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी होती. आता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी करत आहेत. याचा अर्थ हे आंदोलन विद्यार्थ्यांसाठी नाही तर मोदी सरकारला षडयंत्र करून अफवा पसरवून समाजात बदनामी करण्यासाठी चालवलं गेलेले हे आंदोलन आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
एका बाजूला नीटच्या परीक्षा दुसऱ्यांदा झाल्या. पास झालेले विद्यार्थी पुढील वर्षाच्या प्रवेशासाठी धावपळ करत आहेत. नापास विद्यार्थी पुढीच्या तयारीला लागलेले आहेत. मग ह्यांनी आंदोलन चालवलंय कोणासाठी, असा सवालही सदाभाऊ खोत यांन केला.
ते म्हणाले, हे आंदोलन दिशाहीन असून त्याला कोणतीही वैचारिक बैठक नाही. फक्त विरोधक त्याला खतपाणी घालत आहेत. राज्यातील विरोधी पक्ष हे रिकामटेकडे आहेत. या रिकामटेकड्यांना सकाळचे जेवण झाल्यानंतर संध्याकाळच्या जेवणापर्यंत काहीही काम नसतं. ते पारावर बसून अख्या जगाची मापं काढत असतात. पवारसाहेब, उद्धव ठाकरे हे सध्या रिकामटेकडे आहेत, ते संध्याकाळच्या जेवणापर्यंत दंगा करत असतात.
या सगळ्यांनीच शिक्षण व्यवस्थंचं गेल्या ५० ते ६० वर्षां वाटोळं केलेले आहे. त्यांनी आपल्या स्वतःच्या संस्था काढल्या आहेत आणि ते स्वतःच गब्बर झाले आहेत. त्यामुळे या लोकांना बोलण्याचा काय अधिाकर आहे, असा सवालही खोत यांनी केला.
सोनम वांगचूक यांच्याशी सरकारची काहीही तरी चर्चा झाली असेल. पण त्यांची मागणीच चुकीची होती. एखाद्याचा जीव वाचविणे महत्वाचे होते. पण त्यांना वांगचूक यांना शहीद करायचं होतं. पण त्यांचा जीव वाचला पाहिजे, अशी सरकारची भूमिका होती, त्यामुळेच त्यांना उचलून नेलं. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका, हा संदेश आता गेलेला आहे, त्यामुळे त्यांनी आता नवा विषय शोधावा, असे आवाहनही सदाभाऊ खोत यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.