anjali Damania | Ajit Pawar
anjali Damania | Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

NCP Replied Anjali Damania: हे अजित पवारांना बदनाम करण्याचं षडयंत्र; राष्ट्रवादीचा दमानियांवर आरोप

सरकारनामा ब्युरो

NCP Replied Anjali Damania: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे लवकरच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये जाणार असल्याचा खळबळजनक दावा राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.त्यांच्या दावा फेटाळून लावत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी उत्तर दिलं आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना बदनाम करण्यासाठी अंजली दमानिया यांनी भाजपपुरस्कृत ट्वीट केले आहे.अजित पवार यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार अंजली दमानिया यांना कुणी दिला असा सवालही महेश तपासे यांनी केला आहे.विद्यमान सरकारच्या अपात्रतेचा निकाल सुप्रीम कोर्टातून यायचा आहे.निकालानंतर नवीन चित्र निर्माण होईल, असे ट्वीट अंजली दमानिया यांनी केले आहे. याचा अर्थ त्या स्वतः ला प्रसिद्धी मिळवण्यासाठी करत आहेत, असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला आहे. राज्याच्या राजकारणात विरोधी पक्षनेते अजित पवार हे महाविकास आघाडीमध्ये एकत्रितपणे काम करत आहेत म्हणून बदनाम करण्यासाठी अंजली दमानिया यांनी हे ट्वीट केल्याचे महेश तपासे म्हणाले.

काय म्हटल्या होत्या अंजली दमानिया?

आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती दिली.त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपबरोबर जाणार आहेत, तेही लवकरच. बघू…..आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मागील आठवड्यात माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) सात आमदारांसह नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांमुळे एकच खळबळ उडाली होती. त्यातच सामाजिक कार्यकर्त्या आणि आपच्या माजी नेत्या अंजली दमानिया यांनी एक सूचक ट्वीट केलं आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया(Anjali Damania) यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचा फोटो ट्वीट केला आहे आणि “किळसवाणं राजकारण मी पुन्हा येईन” असं कॅप्शन अंजली दमानिया यांनी दिलं आहे. त्यामुळे अजितदादा नॉट रिचेबल अशा बातम्यांना आणि चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT