Rohit pawar  Sarkarnama
मुंबई

Rohit Pawar On NCP Crisis : 'जरी घड्याळ चिन्ह..' ; आयोगाच्या नोटीशीनंतर रोहित पवार स्पष्टच बोलले

Rohit Pawar In Maharashtra Assembly : "निवडणूक आयोग ही सत्ताधाऱ्यांची बाजू घेते.."

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार (Ajit Pawar) यांचा गट शिंदे-फडणवीस सरकारमधे सहभागी झाला. यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडून दोन गट तयार झाले. यानंतर राष्ट्रवादी कुणाची, चिन्ह कुणाला? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. निवडणूक आयोगाने नुकतीच अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाला नोटीस बजावली. अजित पवार गटाने याचिका दाखल केल्यानंतर ही नोटीस बजावण्यात आली आहे. यावरच रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

विधिमंडळ परिसरातील आवारात माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, "गेल्या काही वर्षांमध्ये निवडणूक आयोग ही सत्ताधाऱ्यांची बाजू घेते, असं सामान्य लोकांना वाटत आहे. आयोगाने पक्षाला नोटीस बजावली आहे, ती एक प्रक्रिया आहे. यासाठी आता दोन्ही बाजूंकडून ताकद लावली जाईल, युक्तीवाद होईल."

रोहित पवार पुढे म्हणाले, "आता निवडणूक आयोग या लढाईत कुणाच्या बाजूने निर्णय देईल, याचा अंदाज सर्वांनाच आहे. आम्ही याची न्यायालयीन लढाई लढूच. पण, पुढील काळामध्ये या लढाईत पक्षाकडे जर का चिन्ह राहिलं नाही, तर लोकांनाच विचारावं कोणतं चिन्ह असायला हवे. ते चिन्ह मिळाल्यानंतर लोकांना विश्वासात घेऊन निवडणुकींच्या लढाईलाही उतरावं लागणार आहे."

“यामुळे चिन्हापेक्षा विचार महत्त्वाचे आहेत. शरद पवार यांच्यासोबत राहून, त्यांच्या विचारांची सोबत घेऊन, ही लढाई आमच्यासाठी महत्त्वाची आहे," असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT