Vasai-Virar Municipal Corporation Sarkarnama
मुंबई

नगरसेवकांचे धाबे दणाणले; प्रगती पुस्तकाच्या आधारेच मिळणार तिकीट

या निर्णयामुळे आता पर्यंत फक्त मोठमोठ्या गाड्यातून फिरताना कार्यकर्ते आणि लोकांपासून लांब राहिलेल्या नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत.

सरकारनामा ब्युरो

संदीप पंडित

वसई-विरार : गेल्या वर्ष भरापासून रखडलेली वसई-विरार महानगरपालिकेची (Vasai-Virar Municipal Corporation) निवडणूक (Election) रखडली आहे. अशातच येत्या काही दिवसात ही निवडणूक होणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. या निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर आता निवडणूकीच्या रिंगणात नशीब आजमावण्यासाठी काही माजी नगरसेवकांचे प्रयत्न सुरु झाले आहेत. असे असले तरी त्यांना गेल्या पाच वर्षात त्यांनी केलेल्या प्रगती पुस्तकाच्या आधारानेच तिकीट दिले जाणार आहे. याबाबत बहुजन विकास आघाडीच्या आघाडीच्या नेतृत्त्वाने संकेत दिले आहे. त्यामुळे ज्यांच्या प्रगती पुस्तकावर लोकांमध्ये जाऊन काम केले नाही, असा शेरा असेल, त्या नगरसेवकाला तिकीट नाकारण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

गेल्या पाच वर्षात नगरसेवक म्हणून संबंधित नगरसेवकांनी किती कामे केली, ते लोकांच्या किती संपर्कात राहिले, महत्त्वाचे म्हणजे कोरोना काळात त्यांनी लोकांसाठी किती काम केले, याचा लेखाजोखा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर, अनेक नवीन कार्यकर्ते कोणतीही अपेक्षा न ठेवता लोकांच्यात जाऊन कामे करत होते.

बहुजन विकास आघाडीच्या या निर्णयामुळे आता पर्यंत फक्त मोठमोठ्या गाड्यातून फिरताना कार्यकर्ते आणि लोकांपासून लांब राहिलेल्या नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत. तथापि, आघाडीमध्ये कार्यकर्त्यांच्या शब्दाला मोत्याची किंमत असल्याने कार्यकर्ते सुचवतील त्या उमेदवारालाच उमेदवारी देण्याचा रिवाज आहे. याठिकाणी पक्ष नेतृत्वाकडे जाणाऱ्याला परत पाठवले जाते. त्यामुळे यावेळी अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याचे संकेतही बहुजन विकास आघाडीच्या नेतृत्त्वाकडून मिळाले आहेत.

आता नव्याने बदलणारी प्रभाग रचना, आरक्षण यामुळे अनेकांना पुन्हा नगरसेवकांची लॉटरी लागण्याची आस लागली आहे. त्यामुळे आरक्षणामुळे ज्यांचे पत्ते कापले गेलेत त्यांनी ही पक्षाच्या श्रेष्ठीकडे फेऱ्या मारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे यावेळी उमेदवारीचे निकष बदलले जाणार असल्याने बविआची उमेदवारी कोणाला मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

याबाबत वसई विरार महानगरपालिकेचे माजी महापौर प्रवीण शेट्टी (Former Mayor Praveen Shetty) यांनी माहिती दिली आहे. बहुजन विकास आघाडी मध्ये उमेदवारी देताना पक्ष प्रमुख आमदार हितेंद्र ठाकूर हे कार्यकर्त्याच्या मताला प्राधान्य देत आले आहेत. यावेळीही तीच पद्धत असणार आहे. त्याचबरोबर आमच्याकडे सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे धोरण असल्याने सोशल इंजिनीरिंग सांभाळले जात असल्याचे प्रवीण शेट्टी यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT