Raj Thackeray
Raj Thackeray  
मुंबई

राज ठाकरे सभा : मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीस, २५०० पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज (1 मे) औरंगाबादमध्ये (Aurangabad) यांची सभा होणार आहे. दूसरीकडे या सभेच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाण्यात पोलिसांनी मोठ्या हालचाली सुरु केल्या आहेत. पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना (MNS workers) नोटिसा बजावल्या आहेत.

राज ठाकरेंच्या सभेपूर्वी पोलिसांनी मुंबई, ठाण्यातल्या मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवल्या आहेत. पोलिसांनी मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना बेकायदेशीर जमाव जमवणे ( कलम १४९) कायद्यांतर्गंत नोटीसा बजावल्या आहेत. म्हणजेच, राज्यातील मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंतच अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे 3 मे आणि त्यानंतर जर शहरात अनुचित प्रकार घडल्यास आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला मनसे कार्यकर्ते जबाबदार असतील, असा इशारा पोलिसांनी नोटिसांमध्ये दिला आहे.

असे असतानाच, मनसे कार्यकर्त्यांनी आता महाआरती आणि हनुमान चालीसा पठणाची तयारी सुरु केली आहे. नोटीस पाठवल्यानंतरही हनुमान चालीसा पठणाच्या भूमिकेवर ठाम असल्याचं पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. राज्यभरातील मशिदींवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत राज ठाकरे यांनी भोंगे उतवरवण्यासाठी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला. तसेच भोंगे न उतरल्यास मशिदींसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावण्याचा इशाराही दिला. तसेच, राज ठाकरे यांनी 3 मे रोजी राज्यात महाआरतीचे आयोजन करण्याची सूचना पदाधिकाऱ्यांना दिली आहे.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महाआरती आणि हनुमान चालीसा पठणाची तयारी सुरु केली आहे. नोटीस पाठवल्यानंतरही कार्यकर्ते हनुमान चालीसा पठणाबाबत ठाम असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. राज्यभरातील मशिदींवरील भोंग्यांविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 3 मे पर्यंत भोंगे उतवरले नाहीत तर मशिदींसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावण्यात येईल, अशी भूमिका घेतली आहे. तसंच काही दिवसांपूर्वी 3 मे रोजी राज्यात महाआरतीचं आयोजन करण्याची सूचनाही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना केली.

तर राज ठाकरे यांच्या कार्यक्रमादरम्यान चिथावणीखोर घोषणा, सूचना यांमुळे कोणतेही अनुचित प्रकार घडल्यास आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची जबाबदारी मनसे कार्यकर्त्यांवर असेल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना नोटीसमध्ये दिला आहे. दरम्यान मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंच्या सूचनेनंतर मुंबई आणि ठाण्यात 3 मे रोजी हनुमान चालीसा पठण आणि महाआरतीसाठी तयारी सुरु केली आहे. यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना परवानगीचे विनंती अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी हालचाली वाढवल्या असून मनसे पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT