CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeray  Sarkarnama
मुंबई

तिरुपती देवस्थानला मुंबईत मिळणार जागा: ट्रस्टचे पदाधिकारी उद्धव ठाकरेंना भेटणार

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भारतासह जगभरातील भारतीय नागरिकांचे श्रध्दास्थान असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानाला मुंबई किंवा नवी मुंबईत ५ ते १० एकराचा भूखंड देण्यात येणार आहे. असे आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिले आहे. जागा निश्चित करण्यासाठी तिरुपती तिरुमला देवस्थानाचे पदाधिकारी लवकरच मुंबईत (Mumbai) येणार असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली.

मुख्यमंत्री कार्यालयातील सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच यासाठी ही बैठक निश्चित करण्यात आली होती. मात्र देवस्थान परिसरात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या नातीचा विवाहसमारंभ आणि दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात राष्ट्रपती रामनाथ कोविंद मुंबई दौऱ्यावर येणार असल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली होती. मागील सरकारच्या काळात बांद्रा कुर्ला परिसरात १ हजार चौरस फुटांची जागा देवस्थानाला देण्यात आली. पण त्या ठिकाणी माहिती केंद्र उभारून नव्या जागेवर मंदिर उभारण्याबाबत विचार सुरु आहे.

तिरुमला देवस्थानचे प्रमुख सुब्बा रेड्डी यांनी आज यासंबंधीची घोषणा केली. तिरुपती देवस्थानने आज विश्वस्त मंडळाच्या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली. तिरुपतीला भेट देणाऱ्या हजारो भाविकांना यामुळे मुंबईतच दर्शन मिळणार आहे. त्याचबरोबर, बांद्रा कुर्ला परिसरात पूर्वी मिळालेला भूखंड छोटा असल्याने तो परत करण्याबाबत विश्वस्त मंडळ विचार करत होते. पण तो परत करण्याऐवजी तो माहिती केंद्र म्हणून विकसित केला जावा, असा सल्ला विश्वस्त मिलिंद नार्वेकर यांनी दिला, असेही सुब्बा रेड्डी यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT