Shivaji Park
Shivaji Park  
मुंबई

बाळासाहेब ठाकरे स्मृतीदिन: शिवतिर्थावर आज जनसमुदाय लोटणार

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shivsena Pramukh Balasaheb Thackera) यांचा आज (17 नोव्हेंबर) नववा स्मृतीदिन. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातील हिंदू, शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी शिवतिर्थावर जाऊन त्यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेणार आहेत. 2012नंतर दरवर्षी 17 नोव्हेंबरला लाखोच्या संख्येने लोक शिवतीर्थावर त्यांच्या स्मृतीस्थळाला आदरांजली वाहण्यासाठी जात असतात.

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवाजी पार्कमधील त्यांच्या स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. स्मृतीस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा बसवण्यात आली असून त्यासमोर फुलांची सजावट करून आरास करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे नेतेही त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवतिर्थावर उपस्थित राहणार आहेत.

पण गेल्यावर्षी कोरोना संकटामुळे बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवतीर्थावर कोणालाही जाण्याची परवानगी नव्हती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील आपले निवडक नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळीचे दर्शन घेत त्यांनी आदरांजली अर्पण केली. मात्र यंदा कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे राज्यातील शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेता येणार आहे. मात्र कोरोनाच्या संसर्गाच्यापार्श्वभूमीवर आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहनही शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

17 नोव्हेंबर 2012 रोजी हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जगाचा निरोप घेतला. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांत स्वाभिमान केवळ जागृतच केला नाही तर तो त्यांच्या नसानसात भिनवला. त्यांच्या विचारांनी, कर्तृत्त्वाने मराठी आणि हिंदूं माणसाच्या मनगटात ताकत भरली. मराठी माणसाच्या मनात अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची ऊर्मी दिली. बाळासाहेब ठाकरेंचे ज्वलंत, धगधगते विचार आजही महाराष्ट्रालच नव्हे तर संपुर्ण देशाला प्रेरणा देत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT