Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Uddhav Thackeray, Devendra Fadnavis sarkarnama
मुंबई

सट्टा बाजारात भाजपची चलती ; 120 जागा जिंकल्या तर बुकी देणार 'इतके' रुपये

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील महापालिका निवडणुकांसदर्भात महत्वाचं परिपत्रक जारी केलं आहे. राज्य निवडणूक आयोगानं १३ महापालिकांपाठोपाठ मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच निवडणुकीसाठी सुद्धा सट्टा बाजार सुरु झाला आहे.

शिवसेनेच्या (shivsena) ताब्यातून सत्तेच्या चाव्या घेण्यासाठी भाजप (bjp) सज्ज झाला आहे. सट्टा बाजारात (satta bazar) भाजपची चलती असल्याचे दिसते.

सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातील निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील मुंबई महापालिकेच्या निवडणुकाची अंतिम प्रभागरचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. याशिवाय नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकेच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

गुजरातच्या निवडणुकीला अजूनही सहा महिन्यांचा कालावधी आहे. गुजरात निवडणुकीसाठी सुद्धा मुंबई मनपा निवडणुकीबरोबर बुकींनी सट्टा बाजार सुरु केला आहे. गुजरातमध्ये भाजपला बहुमताने विजय मिळेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

भाजपकडून पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल निवडणूक लढवतील असे बुकींकडून सांगण्यात येत आहे. पटेल यांनी काही दिवसापूर्वी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. पुढील काही महिन्यात ते भाजपमध्ये सामील होतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पटेल 20 ते 25 जागांवर प्रभाव पाडू शकतात ज्या ठिकाणी पाटीदार समाजाचा प्रभाव आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा किती रॅली करतील यावर रेटमध्ये वर खाली होऊ शकतो, असे बुकींचे म्हणणं आहे.

मुंबई महापालिकेत गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे. या सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी चार प्रमुख पक्षांनी कंबर कसली आहे. यामध्ये सत्ताधारी भाजप, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस 236 जागांसाठी लढतील. भाजपला जवळपास 120 जागांवर विजय मिळवण्याची खात्री आहे.

बुकी प्रत्येक एक रुपयाच्या वर 1 रुपया देणार

सध्याचे ट्रेंड पाहता हा आकडा 130 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. बुकी1 रुपया देण्याच्या तयारीत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने 120 जागा जिंकल्याबद्दल बुकी प्रत्येक एक रुपयाच्या वर 1 रुपया द्यायला तयार आहेत. 100 पेक्षा जास्त जागांवर भाजपच्या विजयावर सट्टा लावण्यासाठी, बुकींना प्रत्येक रुपयावर 0.25 पैसे द्यावे लागतील. 110 जागांसाठी एक रुपयावर 55 पैसे इतकी शक्यता आहे. याबाबत 'द हिंदू बिझीनेस लाईन'ने वृत्त दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT